मुंबई : अतिशय कमी वयातच बॉलिवूडमध्ये पाय घट्ट रोवून आपली ओळख तयार करणारा एक अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. महिला वर्गात कार्तिकला कमालीची लोकप्रियता आहे. त्यांच्या मनात या अभिनेत्याविषयी असणारं प्रेम कधीही लपलेलं नाही. काळजाचा ठाव घेणाऱ्या याच नवख्या 'चॉकलेट बॉय'ला आता म्हणे विमानतळावरच कुणीतरी प्रपोज केलं आहे. (Kartik aryan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कार्तिक विमानतळावर असल्याचं लक्षात येत आहे. तो चालत येत असतानाच त्याच्या मागून दोन मुली आल्या आणि याची त्यालाही पुसटशी कल्पना नव्हती. 


या दोन्ही मुली पुढे आल्या आणि त्यांनी अतिशय लाजऱ्या चेहऱ्यानं कार्तिकला गुलाबाचं फूल दिलं. कार्तिकनंही या दोघींनी प्रेमानं दिलेल्या गुलाबाचा स्वीकार केला. 


चाहत्यांच्या मनात असणारं प्रेम व्यक्त होण्याचा हा प्रसंग सर्वांनीच पाहिला आणि हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. 



मुख्य म्हणजे कार्तिकनं आपल्यामागे येणाऱ्या त्या मुली पाहिल्या नाहीत. पण, तिथं असणाऱ्या छायाचित्रकारांनी मात्र त्या मुलींना पाहिलं. हे कळताच त्यानं छायाचित्रकारांना तुम्ही त्यांना पाहिलं का, त्या मागेमागे आल्या का असे प्रश्नही विचारण्यास सुरुवात केली. 


अभिनेत्याप्रती असणारंया दोघींचंही प्रेम संपूर्ण जगानं पाहिलं आणि नकळतच सर्वांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं.