मुंबई : सध्या अनिल कपूर यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनम कपूर पुढील महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये बोलताना कोरिओग्राफर फराह खानने सोनमच्य लग्नाच्या बातमीवर मोहर  लावली आहे.  


काय म्हणाली फराह खान ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, फराह खान लवकरच 'एंटरमेंट की रात' या कार्यक्रमामध्ये दिसणार आहे. या शोमध्ये बोलताना फराह म्हणाली," अनिल कपूर आणि मी एकमेकांना पसंत करतो. आम्ही एकमेकांना 'पापाजी' या नावाने हाक मारतो. मला ते इतके आवडतात की मी त्यांच्या मुलीच्या लग्नाचं संगीतही कोरिओग्राफ करत आहे. 


सोनम कपूर आनंद अहुजासोबत विवाहबद्ध होणार  


काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिझनेसमॅन आनंद अहुजा 6-7 मे दरम्यान विवहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. लग्नानंतर एक रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात आलं आहे. तर लग्न हे मुंबईत होणार आहे. लग्नाचे इतर विधीही मुंबईत होणार आहेत. 
काही दिवसांपूर्वी कपूर कुटुंबीय जिनिवामध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या तयारीत होते. मात्र आता हे लग्न मुंबईतच होणार आहे. 


आनंद अहुजा हा बिझनेसमॅन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आनंद आणि सोनम रिलेशनशीपमध्ये आहेत. 


कोलकत्त्यामध्ये शॉपिंग  


सोनम कपूर जानेवारी  महिन्यात आईसोबत कोलकत्त्यामध्ये दागिन्यांची खरेदी करताना दिसली होती. आता सोनमच्या संगीतामध्ये कपूर कुटुंबीय धम्माल मस्ती करणार आहे. अनिल कपूर यांच्या घरीच सोनमच्या संगीताची प्रॅक्टिस करताना दिसले.