Farah Khan on Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान हा गेल्या तीन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. यंदाचं वर्ष तर शाहरुखसाठी खूप चांगलं ठरलं असं म्हणायला हरकत नाही. त्यानं इतकी वर्षे केलेली मेहनत ही त्या मागचं खरं कारण आहे, असं बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खाननं सांगितलं. यासोबत तिनं शाहरुख खानच्या एका गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी तिनं सांगितलं की शाहरुख कसा एक-एक स्टेप पर्फेक्ट यावी यासाठी किती मेहनत करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी नुकताच एक पॉडकॉस्ट केला. त्या पॉडकास्टसाठी फराह खाननं हजेरी लावली होती. फराह खाननं म्हटलं की 'तिला 'मैं हूं ना' साठी शाहरुख खानचा विना शर्ट एक शॉट हवा होता. पण पाठीला लागलेल्या एका जखमेमुळे तो त्याच्या बॉडीवर फोकस करू शकत नव्हता. त्यामुळे अखेर त्याला सर्जरी करावी लागली. फराह पुढे म्हणाली, 'ओम शांती ओमच्या शूटिंग दरम्यान त्यानं सांगितलं होतं की मी तुला वचन दिल होतं की जेव्हा मी पहिल्यादा कॅमेऱ्यासमोर शर्ट काढेन तेव्हा ते तुझ्या कॅमेऱ्या समोरचं काढेन. त्यानं दोन दिवस पाणी पिलं नव्हतं कारण त्यानं पोट फुलतं. यावर दर्द-ए-डिस्को मध्ये त्याचा लीन लूक पाहायला मिळाला.'



या वेळी फराह खाननं हे देखील सांगितलं की शाहरुख खान हा इतक्या वर्षांनंतरही म्हणजे जवळपास 32 वर्षांनंतर शाहरुख खाननं यावेळी देखील म्हणजे जवानचं चालेया या गाण्याच्या शूटिंग दरम्यान, रिहर्सल करण्यावर भर दिला. कारण त्याला वाटतं की तेव्हाच तो चांगला डान्स करू शकेलं. फराह म्हणाली की 'आता जवानसाठी एक गाणं केलं. 32 वर्षांनंतर देखील त्यावा रिहर्सल करायची असते. मी म्हटलं तुला काय अडचण येते? तू वेडा आहेस?' त्यावर त्यानं सांगितलं की 'नाही, मी विचार करतोय, जर मी रिहर्सल केली तर मी चांगला डान्स करू शकेल.'


हेही वाचा : ...अन् सलमान खानने स्टेजवरच सर्वांसमोर इमरान हाश्मीला केलं किस! VIDEO व्हायरल


शाहरुख खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सध्या सलमान खानच्या 'टायगर 3' मध्ये दिसत आहे. या चित्रपटात त्याची एन्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. इतकंच नाही तर शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. जवाननं प्रेक्षकांवर चांगलीच क्रेझ केली आहे.