Farah Khan : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांची चित्रपट हे सुपरहिट ठरतात. दरम्यान, आता लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खाननं अशाच काही कलाकारांविषयी फराह खाननं खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की शूटिंग सुरु होण्याआधी कलाकार निर्मात्यांना त्यांच्या गरजेच्या गोष्टीची लिस्ट देतात. त्यात चार-चार व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात. त्याशिवाय ते काम करायला तेव्हाच तयार होतात. जेव्हा सेटवर त्यांची व्हॅनिटी व्हॅन असते. फराह खाननं त्यांच्या या सगळ्या डिमांडविषयी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फराह खाननं तिच्या करिअरमध्ये 'मैं हूं ना' आणि 'तीस मार खां' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तिनं शाहरुख खानपासून प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, सुष्मिता सेन आणि अक्षय कुमारसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलं. तिनं कोरिओग्राफर म्हणून अनेक कलाकारांसोबत काम केलं. पण काही असे कलाकार आहेत, ज्यांची मागणी ऐकूण कोणालाही आश्चर्य होते. या सगळ्याचा खुलासा फराहनं यूट्यूब ब्लॉगमध्ये केला आहे. "आजकालचे कलकार तर स्टार्स तोपर्यंत कामाला सुरुवात करत नाही, जोपर्यंत त्यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन ही सेटवर नसते. ते चार-चार व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात. आजकाल प्रत्येक स्टारला त्यांच्या चार व्हॅनिटी व्हॅन हव्यात. एक व्हॅनिटी व्हॅन जिमसाठी, एक स्टाफसाठी, एक स्वत: साठी आणि एक फूट ट्रकच्या रुपात", असं फराहनं सांगितलं.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फराहनं पुढे सांगितलं की "सुरुवातीला झाडांच्या मागे कपडे बदलायचे, आम्ही त्यांच्यासाठी टॉवेल धरायचो. मी स्वत: हे सगळं केलं आहे. जेव्हा तुम्ही आउटडोर शूट करायचो... इतकंच नाही तर स्विट्जरलॅन्डमध्ये सुद्धा. सुरुवातीला अभिनेत्री बसच्या मागे कपडे बदलायच्या. आम्ही तेव्हा चादर घेऊन त्यांच्या चारही बाजूला उभे राहायचो. आता कलाकार तो पर्यंत काम करत नाहीत, जोपर्यंत व्हॅनिटी व्हॅन मिळत नाही." 


हेही वाचा : उगाच नको त्या चर्चा! ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चननं लग्नाच्या वाढदिसानिमित्तानं शेअर केला खास फोटो


दरम्यान, 'बडे मियां छोटे मियां' च्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमार आणि कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांच्याकडे स्वत: ची व्हॅनिटी व्हॅन आहे. त्यावेळी अक्षय म्हणाला, त्याच्याकडे असलेल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्याच्या गरजेच्या वस्तू आणि त्याच्या गरजेनुसार, जेवण बनवलं जातं. तर टायगर श्रॉफजवळ अशी व्हॅनिटी व्हॅन आहे, ज्यात शूटिंगमधून ब्रेक मिळाला की तो तिथे वर्कआऊट करतो, त्या व्हॅनिटीला त्यानं जिमचं रुप दिलं आहे.