Raj Kundra Movie : बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खान ही नेहमीच चर्चेत असते. त्यापेक्षा जास्त चर्चेत तिचे चित्रपट असतात. फराह खान लवकरच तिचा एक चित्रपट घेऊन भेटायला येणार आहे. ही एक बायोपिक असणार आहे. तर फराहनं सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून असं वाटतं आहे की फराह खान ही राज कुंद्रावर बायोपिक बनवणार आहे. फराहनं एक व्हिडीओच शेअर केला आहे. या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फराह खाननं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिजीओत फराह खानसोबत मुनव्वर दिसत आहे. व्हिडीओत फराह मुनव्वरला बोलताना दिसते की यार मुनव्वर चित्रपटासाठी काही आयड्या सांग. त्यावर तो बोलतो की मॅम बायोपिक बनवूया का? फराह बोलते अरे हा, बायोपिक आजकाल खूप चालतात. यावर मुनव्वर बोलतो की राजवर बनवू या. तर फराह बोलते विनम्रतेनं नावं घे. राज कपूर जी, ते तुझे मित्र आहेत का? मग हळूच ते यावर यावर चर्चा करतात. मग मुनव्वर फराहला हातवारे करून सांगतो की जो मुखवटा त्याच्या चेहऱ्यावर लावतो तो राज आहे. यावर फराहला वाटतं की मुनव्वर मनोज कुमार यांच्याविषयी बोलत आहे. तेव्हा मुनव्वर हळूच फराहला जवळ बोलवतो आणि हळूच बोलतो की राज कुंद्रा. यावर फराह आश्चर्यानं बोलते की त्याचा चित्रपट तर शिल्पा शेट्टी पण नाही पाहणार. हे बोलल्यानंतर फराह तिथून उठते आणि निघून जाते. त्यावर मुनव्वर फारूकी बोलतो 'तीस मार खां 2' तरी बनवा. त्यानंतर व्हिडीओ संपतो आणि अखेरीस टू बी कन्टीन्यूड. याचा अर्थ त्याचा दुसरा भाग येणारा आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओवरून अशी चर्चा सुरु आहे की फराह खान शक्योतर राज कुंद्रावर बायोपिक बनवणार आहे. हा व्हिडीओ शेअर करत फराहनं कॅप्शन दिलं की हे टाकण्यासाठी मला भाग पाडण्यात आले आहे... तुम्हाला नाही... त्यामुळे कृपया हे पुढे शेअर करू नका! याशिवाय फराहनं UT69, MaskMan आणि RajKundra हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. आता संपूर्ण देश हा राज कुंद्रावर आधारीत बायोपिक पाहण्याची प्रतिक्षा करत आहे. 


हेही वाचा : सई ताम्हणकरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री झाली मुंबईकर, अखेर खरेदी केलं हक्काच घर


फराहच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅप्पी न्यू ईयर' या चित्रपटाचं तिनं दिग्दर्शन केलं होतं. खरंतर, गेल्याकाही काळापासून ते कोरिओग्राफी आणि इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र होती. तर दुसरीकडे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविषयी बोलायचे झाले तर त्याला 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पॉर्न चित्रपट बनवण्याचा आणि वेगवेगळ्या अॅप्सवर शेअर करण्याचा आरोप होता. या प्रकरणात राज कुंद्राला तुरुंगात रहावे लागले होते. तुरुंगातून बाहेर आल्यापासून राज कुंद्रा हा नेहमीच चेरहा लपवण्यासाठी मास्क घातल्याचे पाहायला मिळते.