मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने अखेर त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा करण्यात आला. या जोडप्याच्या लग्नासाठी खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर अत्यंत खाजगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फरहान खानचं हे दुसरं लग्न आहे. याआधी फरहानने सेलब्रिटी हेअर स्टाईलिश अधुना भबानीसोबत विवाह केला होता. 2000 मध्ये दोघांनी लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली होती. 


फरहान आणि अधुना यांची पहिली भेट 'दिल चाहता है' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती, यातून अधूना भबानीने बॉलिवूड हेअरस्टायलिस्ट म्हणून पदार्पण केले होते. या जोडीने दोन मुलींना जन्म दिला, शाक्या आणि अकिरा अशी त्यांची नाव आहेत. 


2017 मध्ये दोघांनी अधिकृत रित्या घटस्फोट घेतला. यानंतर लगेचच अधूनाने आपल्या रिलेशनशीपबाबत खुलासा केला. तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत याबाबत सगळ्यांना माहिती दिली होती. सोशल मीडियावर अधूना यांनी एक फोटो पोस्ट केला. त्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं.


असं बोललं जातं की, अधुनाने 2017 मध्ये अभिनेता डिनो मोरियाचा मोठा भाऊ निकोलो मोरियाला डेट करायला सुरुवात केली.   अधुनाच्या या रिलेशनशीपमुळेच फरहानने  तिच्यापासून घटस्फोट घेतल्याचं बोललं जातं. 2016 मध्येच फरहान आणि अधुनाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 



नुकत्याच फरहान अख्तरच्या दोन्ही मुली लग्नसोहळ्यात दिसल्या. त्यांच्यासोबतचे खास फोटो फरहानने शेअर केले आहेत.