बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal) यांनी प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्यांसोबत काम केलंय. फरीदा या जया बच्चनसोबत (Jaya Bachchan) कभी खुशी कधी गममध्ये दिसल्या होत्या. खरं तर या दोघींनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. पण नुकताच एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, 'कल हो ना हो' मध्ये जया बच्चनची सासू बनण्यास नकार दिला होता. यामागील खरं कारण होतं ते करण जोहरसोबत (karan johar) असलेले मतभेद. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो, खुद्द फरीदा जलाल यांनी करण जोहरचे वडील दिवंगत यश जोहर यांच्याबद्दल भाष्य केलं. बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करणबद्दलची नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्यात की, करण जोहरचे वडील यश जोहरशी त्यांचं वर्किंग रिलेशन होतं. पण जेव्हापासून धर्मा प्रॉडक्शन करण जोहर सांभाळतोय तेव्हापासून त्यांना तो मान मिळाला नाही. 


जया बच्चनची सासूची भूमिका करण्याबद्दल फरिदा यांनी का नकार दिल्या त्याबद्दलही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्यात की, जया बच्चन यांच्यासोबत कधी खुशी कभी गममध्ये जया बच्चनसोबत समान वयाची स्त्री म्हणून काम केलं. तर कल हो ना हो चित्रपटात जया बच्चनची सासूची भूमिका का करु?


त्या पुढे म्हणाल्यात की, आधीच्या काळात करण जोहर...पण आजकाल तो कसा आहे, हे मला माहिती नाही. तो निष्ठा खूप लवकर बदलतो. आजकाल त्यांच्या चित्रपटात माझ्यासाठी भूमिका तुम्हाला दिसल्या नसतील. पण एक काळ असा होता धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात माझ्याशिवाय चित्रपट होत नव्हते. त्यांचे वडील यश जोहर हे माझ्या आवडत्या निर्मात्यांपैकी एक होते. काय माणून, काय रत्न होता तो! ते मला फोन करून म्हणायचे, 'हे बघ फरीदा, हिरोची भूमिका नंतर लिहिली जाते, तुझी भूमिका आधी लिहिली जाते'. 


'करण माझी भेट ही दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेच्या सेटवर झाली होती. तेव्हा आदित्य चोप्राला करण मदत करत होता. त्यावेळी आम्ही खूप जवळ आलोत. तो मला सांगायचा तो एक चित्रपट बनवणार आहे. काजोल, शाहरुख आणि तुम्ही सगळे. तो मला कुछ कुछ होता है या चित्रपटाची कथा सांगितली. तो चित्रपट अजूनही त्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक दृष्य तो स्वत: लिहिलं आहे. ती कथा ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले होते.'


मात्र काही दिवसांनंतर आमच्यामध्ये वाद झाला. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, 2012 मध्ये स्टुडंट ऑफ द इयरनंतर करणने त्यांना कोणत्याही धर्म प्रोजेक्टमध्ये कास्ट केलं नाही. खरं तर त्यांच्यासोबत करण वाईट वागला होता, तरीदेखील फरिदा यांनी करणला फोन केला होता. पण स्टुडंट ऑफ द इयरनंतर त्यांनी एकत्र काम केलं नाही. 


आदित्य चोप्रासोबतही असाच अनुभव त्यांना आला. यश चोप्रा यांनी कोणताही भूमिकेबद्दल विचारलं तर मी दोनदा विचार करणार नाही. पण त्यांनी DDLJ मध्ये एकत्र चांगल काम केलं तरी पण आदित्यने भविष्यात YRF त्यांना कास्ट केलं नाही.