मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबातून बॉलिवूडच्या दुनियेत आणखी एकाची एंट्री झाली आहे आणि ती म्हणजे त्याची भाची अलिजेह अग्निहोत्री. ज्याची अधिकृत घोषणा सलमानने चित्रपटाचा टीझर शेअर करून केली आहे. अलिझेहच्या पदार्पणाच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून येत असल्या तरी याबद्दल कधीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. आता अखेर त्याच्या आगामी 'फरे' या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. जो खूपच प्रभावी असल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थ्रिलर सिनेमा आहे फर्रे
या टीझरवरून हे स्पष्ट होतं की, 'फरे' हा एक थ्रिलर चित्रपट आहे जो शालेय विद्यार्थ्यांवर आधारित आहे. ज्यामध्ये सर्वजण परीक्षेत फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर मोठ्या अडचणीत येतात. या चित्रपटात अलिझेहची झलकही स्पष्टपणे पाहायला मिळतेय. हा टीझर स्वतः सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर करत आपल्या भाचीचं प्रमोशन केलं आहे. काही काळापूर्वी सलमान अंबानींच्या गणपतीच्या सेलिब्रेशनमध्ये अलिजेसोबत दिसला होता. आणि यावेळचे तिचे सुंदर फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


चित्रपटाच्या टीझरनंतर आता सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जो लवकरच शेअर केला जाईल. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला दिवाळीनंतर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बरं, हे होतं सलमान खानच्या भाचीबद्दल पण जर आपण भाईजानबद्दल बोललो तर सध्या तो अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे आणि सर्वात जास्त चर्चेत असलेला टायगर 3 आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावर्षी दिवाळीच्या आधी म्हणजे १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रत्येकजण त्याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात तो कतरिना कैफसोबत दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. टायगर 3 मध्ये शाहरुख खानचाही कॅमिओ असल्याची बातमी आहे. पठाण आणि टायगर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.