मुंबई : अभिनेत्री तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटामधून 2019 मध्ये एकत्र केली. अभिनयाबरोबरच या दोघांनीही आपल्या स्टाईल आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकली. त्याचवेळी, बॉलिवूडच्या या दोन सुंदर अभिनेत्रींनी ट्रेंडी सिक्विन गाऊन परिधान केला होता. स्टाईलच्या दृष्टीने दोघीही वेगळ्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व प्रथम, आपण तारा सुतारियाच्या लुकबद्दल बोलूया जिने ब्लश गुलाबी रंगाचा गोल्डन सिक्विन ड्रेस परिधान केला होता. ताराने हेवी कर्ल आणि एक सॉफ्ट स्मोकी आयमेकपसह एक स्ट्रॅपलेस ड्रेस स्टाईल केला होता. ताराने तिच्या शिमर ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि आपला मेकअप कमीतकमी ठेवला.



तारा नंतर करण जोहरच्या पुढची स्टुडंट म्हणजेच अनन्या पांडे. यावेळी अनन्याने सिल्वर सीक्विन ड्रेस परिधान केला होता. तारा प्रमाणेच, अनन्याचा ड्रेस थाय-हाई स्लिट आणि एक लांब साइड ट्रेल ड्रेस होता. अनन्याने सॉफ्ट वॉल्यूमिनस कर्ल्ससह आपला लूक स्टाईल केला आणि न्यूट्रल आणि फ्लॉलेस ठेवला. या लूकमध्ये अनन्याने नक्कीच तिच्या चाहत्यांची मने जिंकली. तारा आणि अनन्याने लूक ट्रेंडी ठेवला आणि त्यांचे लांब टोंड लेग्स फारच आश्चर्यकारक दिसले.