Actress changed her religion to get married : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाचा आज 10 एप्रिल रोजी तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजशा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तिला चित्रपटांपासून लांब राहायचं आहे. आता चित्रपट नसले तरी तिचं खासगी आयुष्य हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. जेव्हा आयशानं तिचा धर्म बदलून बिझनेसमॅनसोबत लग्न केलं. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयशाविषयी सगळंच जाणून घ्यायचं झालं तर 10 एप्रिल 1986 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. मिश्र सांस्कृतिक ती लहाणाची मोठी झाली. त्याचं कारण म्हणजे आयशाचे वडील हे गुजराती हिंदू होते, तर आई फरीदा एंग्लो-इंडियन. आयशा ही सोशल मीडियावर सक्रिय नसली तरी देखील ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. आयशानं बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यामुळे चित्रपटात येणं तिच्यासाठी थोडं सोपं होतं. आयशाच्या पहिल्या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर तिनं 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टार्जन: द वंडर कार' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्या चित्रपटासाठी तिला फिल्मफेयर बेस्ट डेब्यू अवॉर्ड देखील मिळाला. त्याशिवाय दिला आईफा अवॉर्ड स्टार डेब्यू ऑफ द ईयर फीमेल हा पुरस्कार देखील मिळवला. यानंतर तिनं कधी मागे वळून पाहिलं नाही. 


आयशानं तिच्या 7 वर्षांच्या करिअरमध्ये 21 चित्रपटांमध्ये काम केलं. तिचे काही चित्रपट फ्लॉप झाले तर काही चित्रपट हिट. लग्नाच्या आधीपर्यंत आयशानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. असं म्हटलं जातं की सलमान खानसोबतच्या 'वान्टेड' या चित्रपटानंतर आयशाचे एकामागे एक चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यामुळे तिच्या करिअरचा ग्राफ हळूहळू खाली येऊ लागला होता. अशात आयशानं अभिनय सोडतं लग्न करण्याचा निर्णय घेतला. समाजवादी पार्टीचे नेता अब्बू आजमी यांचा मुलगा फरहान आजमीशी आयशानं लग्न केलं. फरहान हा एक बिझनेसमॅन आहे. 


जनसत्ता.कॉमनं दिलेल्या रिपोर्टनुसार, फरहानशी लग्न करण्यासाठी आयशाला खूप मेहनत करावी लागली होती. ते दोघं जवळपास चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि 2009 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्यासाठी आयशाला इस्लाम स्वीकारावा लागला आणि त्यानंतर तिचं नाव आयशा टाकियाचं आयशा आजमी ठेवलं. जेव्हा आयशानं फरहानशी लग्न केलं तेव्हा ती 23 वर्षांची होती. त्या दोघांना एक मुलगा असून त्यांच्या मुलाचं नाव मिखैल आहे. तर चित्रपटसृष्टीला रामराम करुन ती सध्या मुलाचा सांभाळ करत आहे. 


हेही वाचा : 'दिलजीतचं लग्न झालंय! भारतीय वंशाची अमेरिकन पत्नी, 1 मुलगा....' कुटुंबाविषयी मित्रानं केला खुलासा


दरम्यान, असं म्हटलं जातं की आयशानं तिचं फ्लॉप करिअर पाहता हा निर्णय घेतला होता. आयशाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'टार्जन: द वंडर कार' या चित्रपटानंतर 'सोचा ना था' , 'सलाम-ए-इश्क', 'वान्टेड' आणि 'पाठशाला' या चित्रपटांमध्ये दिसली. 2004 ते 2011 असा आयशाचा अभिनय क्षेत्रातील करिअरचा काळ होता.