नेटफ्लिक्सवरुन हटवले जाणार 26 चित्रपट-वेबसीरिज, आताच पाहून घ्या...
नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात येणारे हे चित्रपट आणि वेबसीरिज काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. हे हटवण्यामागचे कारणही समोर आले आहे.
Netflix Removing 26 Films-Web Series : करोनानंतर अनेकांना घरबसल्या चित्रपट किंवा वेबसीरिज पाहण्याची सवय लागली. करोना संपल्यानंतरही अनेकजण हे चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याऐवजी ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती दर्शवतात. पण आता नेटफ्लिक्सवरील काही वेबसीरिज हटवण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन 26 चित्रपट काढले जाणार आहे. यात कोणते चित्रपट आहेत, त्याची यादी समोर आली आहे.
26 चित्रपट-वेबसीरिज हटवण्यामागील कारण
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन दर महिन्यात काही चित्रपट किंवा वेबसीरिज काढून टाकल्या जातात. फेब्रुवारी महिन्यातही नेटफ्लिक्सवरील 26 चित्रपट आणि वेबसीरिज हटवले जाणार आहे. याचे कारणही समोर आले आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रत्येक वेबसीरिज आणि चित्रपटाच्या निर्मात्यांशी करार असतो. हा करार एका ठराविक कालावधीसाठी केला गेलेला असतो. अनेकदा हा करार पुन्हा बनवला जातो. तर काही वेळा हा करार संपुष्टात येतो.
नेटफ्लिक्ससोबतचा करार संपला की त्यावरुन हे चित्रपट त्वरित हटवले जातात. याचाच अर्थ चित्रपट किंवा वेबसीरिज निर्मात्यांचा नेटफ्लिक्ससोबत जितक्या महिन्यांचा करार असतो, तितकेच महिने तुम्हाला एखादा चित्रपट पाहता येतो. या नियमानुसार फेब्रुवारी महिन्यात 26 चित्रपट आणि वेबसीरिज हटवले जाणार आहे. यात कोणकोणत्या चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा समावेश आहे, याची यादी समोर आली आहे.
नेटफ्लिक्सवरुन हटवले जाणार 'हे' चित्रपट
7 फेब्रुवारी - एमटीवी फ्लोरिबामा शोर सीजन 1
9 फेब्रुवारी - 'प्रिजनर्स'
10 फेब्रुवारी - 'फादर स्टू' आणि 'गूसबंप्स'
14 फेब्रुवारी - 'चिकन रन', 'प्रोमेथियस', 'रियल स्टील'
19 फेब्रुवारी - 'ऑपरेशन फिनाले'
27 फेब्रुवारी - 'अमेरिकल पिकर्ल सीजन 15'
28 फेब्रुवारी - 'बेबीलोन बर्लिन सीजन 1-3', 'मॉर्बियस', 'स्नोपीयरसर', 'द लास्ट ब्लैक मैन इन सैन फ्रांसिस्को'
29 फेब्रुवारी - 'द एडवेंचर्स ऑफ शार्कबॉय एंड लावागर्ल', 'डोंट वरी डार्लिंग', 'ड्रेड', 'ड्यून', 'गुड बॉयज', 'लीजेंड्स ऑफ द फॉल', 'लोन सर्वाइवर', 'पॉल ब्लार्ट: मॉल कॉप', 'पॉल ब्लार्ट: मॉल कॉप 2', 'आरआईपीडी', 'शीज ऑल दैट', 'शीज द मैन', 'स्टैंड बाय मी'
चाहत्यांसाठी शेवटची संधी
दरम्यान नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात येणारे हे चित्रपट आणि वेबसीरिज काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. यात 2021 ला प्रदर्शित झालेला ड्यून, 2022 मध्ये प्रदर्शित झालेला डोंट वरी डार्लिंग यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तर यातील काही चित्रपट हे 1994 आणि 1986 यादरम्यानचेही आहेत. त्यामुळे चाहत्यांना फेब्रुवारी महिन्यातच हे चित्रपट पाहण्याची ही शेवटची संधी मिळणार आहे.