मुंबई : अमेरिकेत एका पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाला तिच्या हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'साठी नामांकन मिळालंय. या पुरस्काराची एक वेगळीच गंमत आहे.


'सगळ्यात वाईट सिनेमा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या प्रियांकाला तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'साठी नामांकन मिळालंय. प्रियांकाच्या या सिनेमाला 'वर्षातील सगळ्यात वाईट सिनेमा' या कॅटेगिरीमध्ये नामांकन मिळालं आहे. 


प्रियांकाने हॉलिवूडसाठी बॉलिवूडकडे पाठ वळवली आहे. पण तिच्या पहिल्याच हॉलिवूड सिनेमाचा झालेला हा 'फियास्को' तिच्या चाहत्यांना निराश करणारा आहे.


...पण नो प्रॉब्लेम!


पण या गोष्टीचा प्रियांकावर काही फरक पडलेला दिसत नाही. कारण नुकत्याच झालेल्या 'प्री-ग्रॅमी गाला नाईट' कार्यक्रमात प्रियांकाने सगळ्या इंटरनॅशनल मीडियाचं लक्ष वेधलं होतं.


त्यामुळे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न झाला असला तरी आपल्या 'देसी गर्ल'नं तिच्या अनोख्या अदांनी पुन्हा एकदा टीकाकारांची तोंड बंद केलीत.