बच्चन कुटुंबातील वाद वाढला? बिग बींनी ऐश्वर्याविरोधात उचचलं मोठं पाऊल! चाहत्यांनी दिले पुरावे
नेहमीच बच्चन कुटूंब लाइमलाईटमध्ये असतं. नुकतंच बच्चन कुटूंब आणि त्यांची सून ऐश्वर्यामध्ये वादविवादाच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. अनेकदा ऐश्वर्यासोबतचा कौटुंबिक वाद सार्वजनिकरित्या कॅमेऱ्यात कैद होतात.
मुंबई : नेहमीच बच्चन कुटूंब लाइमलाईटमध्ये असतं. नुकतंच बच्चन कुटूंब आणि त्यांची सून ऐश्वर्यामध्ये वादविवादाच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. अनेकदा ऐश्वर्यासोबतचा कौटुंबिक वाद सार्वजनिकरित्या कॅमेऱ्यात कैद होतात. मात्र आता एक अशी बातमी समोर येत आहे जी ऐकून तुम्हालाही ऐकून मोठा धक्का बसणार आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये दुरावा आल्याची बातमी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ही चर्चा सुरु असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या राय बच्चन विरोधात मोठं पाऊल उचललं आहे. जे पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.
अमिताभ बच्चन सून ऐश्वर्या विरोधात उचललं मोठं पाऊल
सध्या सोशल मीडियावर एक Reddit पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बीग बी त्यांची सून ऐश्वर्याला फॉलो करत नसल्याचं दिसत आहे. यानंतर एक रेडिट युजरने पोस्ट शेअर करत विचारलं आहे की, बिग बी यांनी ऐश्वर्या राय बच्चनला इन्स्टाग्रामवरुन खरंच अनफॉलो केलं आहे? यावंर काही लोकांनी दावा केला आहे की, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्याने कधी एक दुसऱ्यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो नाही केलं. काही लोकांनी असंही म्हटलं आहे की, काहीतर खरंच गडबड आहे. तर कोणीतरी म्हणालंय, हे एक प्रायव्हेट सेटिंगमुळे असू शकतं जिथे फक्त अमिताभ बच्चन ज्यांना फॉलो करतात तेच पाहू शकतात इतर कोणी नाही.
यामुळे पसरत आहेत ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वादाच्या अफवा
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेले अनेक दिवस या अफवा पसरत आहेत की, गेले अनेक दिवस ऐश्वर्या बच्चन कुटूंबात राहण्याऐवजी आपल्या आईच्या घरी जास्त टाईम स्पेंड करत आहे. आजाकाल अभिनेत्री तिचीआई आणि तिची मुलगी आराध्यासोबत पब्लिक ईव्हेंटमध्ये जाताना दिसतात. एवढंच नव्हेतर ती अनेकदा तिच्या आई आणि मुलीसोबत फोटो शेअर करत असते. एवढंच नव्हेतर
अभिषेक बच्चन व्यतिरिक्त कुटुंबातील कोणीही ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतही ऐश्वर्या एकटीच पोहोचली होती. या सगळ्यानंतर ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात काही तरी बिनसलं असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. मात्र, या अफवांवर अद्यापतरी ऐश्वर्या किंवा बिग बीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.