Shyam Benegal Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता श्याम बेनेगल यांचं सोमवारी मुंबईत निधन झालंय. दीर्घकाळ आजारीपणामुळे वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल यांची मुलगी पिया बेनेगल हिने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. मुंबई सेंट्रल इथल्या वोकार्ट हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिया बेनेगल यांनी सांगितलं की, तिचं वडील दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. अंतिम संस्काराबाबत निर्णय घेतला जाईल.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री शबाना आझमीने तिच्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे फोटो शेअर केले होते. फोटोमध्ये श्याम बेनेगल, शबाना आणि नसीरुद्दीन शाह यांचा हा हसरा फोटो आहे. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला उत्तम अभिनेते दिले, त्यापैकी नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग, शबाना आझमी, स्मिता पाटील आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी हे प्रमुख आहेत. जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित रे यांच्यावर माहितीपट बनवण्याबरोबरच त्यांनी दूरदर्शनसाठी 'यात्रा', 'कथा सागर' आणि 'भारत एक खोज' या मालिकांचे दिग्दर्शनही केले.


8 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले


श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना 8 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. झुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो, मंडी, आरोहण, वेलकम टू सज्जनपूर यांसारखे डझनभर उत्तम चित्रपट त्यांनी केले आहेत. श्याम बेगेनल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही बहाल करण्यात आलाय. त्यांच्या कारकिर्दीत 24 चित्रपट, 45 माहितीपट आणि 1500 जाहिरात चित्रपट बनवले आहेत. 1976 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. 1991 मध्ये श्याम बेगेनल यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.