Jharkhand actor murder case: बॉलीवूड अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) मृत्यूमुळे मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली होती. त्यातच आता मनोरंजन विश्वातून आणखी एक बातमी समोर येत आहे. झारखंडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची (Riya Kumari) 28 डिसेंबर रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी (Riya Kumari) ही तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत असताना हि घटना घडली. रिया कुमारीच्या (Riya Kumari) मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर पोलिसांकडून रिया कुमारी हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पोलिसांनी यूट्यूबर रिया कुमारीचा (Riya Kumari Youtuber) पती प्रकाश कुमार (prakash kumar) याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रियाचा पती प्रकाश कुमार याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. प्रकाश याने दरोड्याची घटना सांगून पोलिसांची दिशाभूल केल्याचे आरोपात म्हटले आहे. पोलिसांच्या चौकशीत तो वारंवार पोलिसांची दिशाभूल करत होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि हत्येचे गूढ उकलण्यास मदत झाली.


वाचा : ऑनलाईन शॉपिंग करताय? थांबा, नाहीतर तुमची एक चूक अन् बँक खातं रिकामं! 


रिया कुमारीच्या पतीला अटक


हावडा ग्रामीण एसपी स्वाती भंगालिया यांनी सांगितले की, रिया कुमारीचा पती प्रकाश सिंह याला रिया कुमारीवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला आज (29 डिसेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे.


अशाप्रकारे रिया कुमारीच्या हत्येचे गूढ उकलले


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रिया कुमारीच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, प्रकाश रिया कुमारीला त्रास देत असे आणि तिला मारहाण करत असे. त्याने रिया कुमारीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.


प्रकाश कुमार यांनी कट रचला


विशेष म्हणजे रिया कुमारी हत्या प्रकरणात प्रकाश यांची अनेक टप्प्यांवर चौकशी केली जात होती. त्यांच्या वक्तव्यात तफावत असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी प्रकाशला आज (गुरुवारी) सकाळी अटक केली. प्रकाशनेच दरोड्याचा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


दरम्यान यापूर्वी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते की, रिया कुमारी उर्फ ​​ईशा आलिया झारखंडमधील अभिनेत्री आणि यूट्यूबर आहे. हावडा जिल्ह्यात दरोड्याच्या वेळी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ती झारखंडहून कोलकाता येथे जात असताना ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. 


कोण होती रिया कुमारी?


रिया कुमारी झारखंडमधील अभिनेत्री होती. ती एक लोकप्रिय यूट्यूबर देखील होती. रिया कुमारीचा पती प्रकाश कुमार चित्रपट दिग्दर्शक आहे. प्रकाशने अनेक शॉर्ट फिल्म्स आणि जाहिराती बनवल्या आहेत. याशिवाय प्रकाशचा खाणींचाही व्यवसाय आहे.