Boney Kapoor: चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) बोनी कपूर यांच्या मालकीची चांदीची भांडी (Silverwares) जप्त केली आहेत. कर्नाटकाच्या देवंगेरे (Davangere) येथील चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने एकूण 66 किलो भांडी जप्त केली असून, त्याची किंमत एकूण 39 लाख इतकी आहे. कर्नाटकात लवकरच निवडणुका होणार असून त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग राज्यभरात कारवाई करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएमडब्ल्यू कारमधून ही चांदीची भांडी नेली जात असताना ही कारवाई करण्यात आली. पाच बॉक्समध्ये ही भांडी चेन्नईहून मुंबईला नेली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, योग्य कागदपत्रं सादर करण्यात न आल्याने सर्व भांडी जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वाट्या, चमचे, ग्लास आणि प्लेट्स जप्त केल्या आहेत. 


याप्रकरणी देवंगेरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीमध्ये चालक सुलतान खानसोबत असणाऱ्या हरि सिंग याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तपासादरम्यान ही कार Bayview Projects Pvt Ltd यांच्या नावे नोंद असल्याची माहिती मिळाली. ही कंपनी बोनी कपूर यांच्या मालकीची आहे. पोलिसांनी चौकशी केली असता हरि सिंग याने ही भांडी बोनी कपूर यांच्या मालकीची असल्याची कबुली दिली. 


या भांड्याची योग्य कागदपत्रं नसल्याने अधिकाऱ्यांनी सर्व भांडी जप्त केली आहेत. दरम्यान, या भांड्यांचा बोनी कपूर यांच्या कुटुंबीयांशी काही संबंध आहे का याचा तपास अधिकारी करत आहेत.