मुंबई : अभिनेते, चित्रपट निर्माते सतिश कौशिक येत्या महिला दिनी खास महिलांवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. सतिश कौशिक यांचा पहिला हरियाणवी चित्रपट 'छोरिया छोरो से कम नही होती' यादिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. गुरूवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतिश कौशिक यांनी 'मी माझं बालपण हरियाणामध्ये घालवलं आहे. मुलींना सामना कराव्या लागणाऱ्या सर्व समस्यांबद्दल मला माहिती आहे. आम्ही एक भावनात्मक चित्रपट बनवला असून तो एका सत्य घटनेवर आधारित आहे' असं सांगितलं. राजेश बब्बर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे.


सतिश कौशिक यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटात अभिनयही केला आहे. चित्रपटातून लैंगिक असमानतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हरियाणात कडक कायदे असूनदेखील आजही भ्रूणहत्या केली जाते. मुलगी जन्मला आली तर तिला मोठ्या असमानतेचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.  


सतिश कौशिक यांनी हरियाणासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. 'छोरिया छोरो से कम नही होती' या चित्रपटात हरियाणामधील ८० टक्के कलाकारांनी काम केलं आहे. हरियाणातील कलांकारांनाही संधी मिळावी, इथल्या लोकांमधील टॅलेंट सर्वांसमोर यावं यासाठी त्यांनी चित्रपटात नव्या हरियाणवी चेहऱ्यांना संधी दिली असल्याचं सतिश कौशिक यांनी सांगितलं.