मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरदेखील ती कायम सक्रीय असते. आई गौरी खान आणि सुहाना यांच्यात मैत्रीचं नाते आहे. गौरी खान नेहमीच मुलीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गौरीने नुकताच शेअर केलेला त्यांचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. सुहानाने यंदाच्या वर्षी पदवी संपादन केली आहे. त्यामुळे ती आता कधी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सुहानाने लंडनच्या 'Ardingly College'मधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. हाच आनंददायी क्षण साजरा करत माय-लेकींनी महाविद्यालयात जेवणाचा आस्वाद घेतला. गौरीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'Ardingly College मध्ये जेवण... आणि पदवी' असे लिहिले आहे. 



त्याचप्रमाणे सुहानाला सांस्कृतिक कार्यक्रमातील योगदान दिल्याबद्दल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. सुहाना पुरस्कार स्वीकारताना एक व्हिडिओ गौरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 


गतवर्षी सुहानाने तिच्या वडिलांच्या 'झिरो' या चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. त्याचप्रमाणे रंगमंचावरील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहरूखच्या मुलीला अभिनयात आपली छाप पाडायची असून मुलाला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे