मराठीतील लोकप्रिय कलाकारांची पहिली कमाई!
मनातील सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आज लाखो रुपये कमवत असले तरी त्यांनाही संघर्ष काही चुकलेला नाही.
मुंबई : मनातील सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आज लाखो रुपये कमवत असले तरी त्यांनाही संघर्ष काही चुकलेला नाही. सुरुवातीच्या काळात त्यांचीही कमाई तुटपुंजी होती. आता कितीही पैसे कमवत असले तरी प्रत्येकासाठी त्याची पहिली कमाई काही खासच असते. तर जाणून घेऊया या नावाजलेल्या मराठी कलाकारांची पहिली कमाई...
आता लाखोने कमावणारा मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशीची पहिली कमाई ८० रुपये होती. एका नाटकाच्या मानधनाच्या रुपात त्याला हे पैसे मिळाले होते.
चला हवा येऊ द्या या मालिकेत विदर्भाचा तडका देणारे अभिनेते भारत गणेशपुरे यांची पहिली कमाई ५०० रुपये होती. अमरावतीहून मुंबईत आल्यानंतर एका दिग्दर्शकाकडे तीन महिने काम केल्यानंतर ५०० रुपये मिळाले होते.
१५ वर्षांचे असताना अभ्युदय नगरमध्ये मिरवणुकीत ढोल वाजवल्यामुळे त्यांना १५ रुपये मिळाले होते.
१९९१ मध्ये महाराष्ट्राची लोकधारा या नाटकात काम करण्यासाठी अंकुशला १५ रुपये मिळायचे.
सुयोग संस्थेच्या 'आम्हाला वेगळं व्हायचंय' या नाटकातून मुक्ताला १५० रुपये मिळायचे.
नाना पाटेकरांनी नववीत शिकत असताना ३५ रुपये महिना अशी नोकरी केली होती. यासाठी ते माटुंगा ते चुनाभट्टी हे नऊ किलोमीटरचे अंतर चालत पार करायचे.
‘महाराष्ट्राची लोकधारा’सारखाच एक कार्यक्रम पुण्यात होत असे. त्यात टीमसोबत प्रसाद कोरसमध्ये गायचा. त्यासाठी त्याला त्यावेळी २५ रुपये मिळाले होते.
आठवीत असताना समीर मित्राच्या घरी गणपतीचे डेकोरेशन करत असे. त्यासाठी त्याचा मित्राचा भाऊ त्याला १०० रुपये देत असे.