मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे नाव 'कबीर सिंह' असे आहे. शाहीदने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'आपल्या आतील कबीर सिंगला शोधण्याचे आवाहन केले आहे.' पोस्टर मध्ये शाहीद एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. हा चित्रपट एका तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शन अर्जुन रेड्डी यांनी केले होते. 'कबीर सिंह' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संदीप वांगा यांनी घेतली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


एका प्रेमकथेवर हा चित्रपट फिरताना दिसणार आहे. चित्रपट एका मेडीकल सर्जन मुलाच्या खाजगी आयुष्यावर आधारलेला आहे. चित्रपटात त्याच्या गर्लफ्रेंडचा विवाह एका अनोळख्या मुलासोबत जबरदस्तीने करण्यात येते. त्यानंतर मेडीकल सर्जन चुकीच्या मार्गाकडे वळतो. तो आमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटात शाहीदसह कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.