मुंबई : कपिल शर्माचा दुसरा चित्रपट फिरंगीचं पहिलं गाणं ओए फिरंगी शुक्रवारी लॉन्च करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये कपिल शर्मा वेगळ्याच अंदाजामध्ये दिसत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाची कहाणी इंग्रजांच्या शासन काळातली असल्याचं सांगण्यात येतंय. कपिल शर्मा इंग्रजांच्या शासन काळातल्या गुलामाच्या भूमिकेत दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरची कहाणी फ्लॅशबॅकमध्ये सुरू होत असल्याचं दाखवण्यात आलंय. यामध्ये कपिल शर्मा एका लहान मुलीला इंग्रजांच्या काळातली गोष्ट सांगत आहे. कपिलचा हा चित्रपट कॉमेडी असला तरी पहिल्या चित्रपटाएवढी कॉमेडी या चित्रपटामध्ये नसेल. कपिलबरोबरच दृश्यम चित्रपटामध्ये असलेली इशिता दत्ता मुख्य भूमिकेत आहे. 


कपिल शर्मानंच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर राजीव धिंगरा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. कपिलच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमी वेळ मिळणार आहे, कारण एका आठवड्यानंतर १ डिसेंबरला पद्मावती हा चित्रपट रिलीज होणार आहे. 


पाहा फिरंगीचं पहिलं गाणं