horrible!!! अभिनेत्रीकडून ऑडिशनच्या `गंदी बात`ची पोलखोल
`गंदी बात` फेम फ्लोरा सैनीने सांगितला ऑडिशनचा खराब अनुभव....ऑडिशनला बोलावून ते मला....
मुंबईः अभिनेत्री फ्लोरा सैनी तिच्या चित्रपट आणि वेबसीरिज व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच, तिने इंडस्ट्रीमध्ये आलेले वाईट अनुभव शेअर केले आहेत. ऑडिशनवेळी अनेकवेळा बॉडी शेमिंगला सामारं जावं लागलं असं फ्लोरा सैनीनं म्हटलं आहे.
फ्लोराने 1999 मध्ये तेलुगू चित्रपटांमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. फ्लोराने सांगितले की, तिला फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीतच काम मिळाले. करिअरच्या सुरुवातीला मी खूप चांगलं काम करत होते. त्या दहा वर्षांत मी काम मिळवण्यासाठी मुंबईला गेले मात्र तेव्हा मला काम मिळालं नाही.
ऑडिशनला आल्यावर निर्मात्यांकडून वजन कमी करण्यास सांगितलं गेलं. फ्लोरा म्हणते, मुंबईचा प्रवास खूप वाईट होता, फ्लोरा सैनीने सांगितले की, तिला अशाप्रकारे अनेक वेळा नकार देण्यात आला होता, या अशा नकारांमुळे आपण खूप खचल्याचा अनुभव फ्लोरानं सांगितलं. मात्र दाक्षिणात्य सिनेमात गोलमटोल असतानाही काम मिळत असल्याचं फ्लोरा सांगते.
अभिनेत्रींना अनेक वेळा बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागतं. अनेक अभिनेत्री खुलेपणाने हा अनुभव शेअर करतात. तर काही या गोष्टी लपवून ठेवतात. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी खुलेपणाने बॉडी शेमिंगचा अनुभव खुलेपणाने शेअर केला आहे.