सलमान-अक्षयने म्हटलं `NO`, अन् एक फ्लॉपस्टारचे नशीब चमकले, चित्रपटाने कमावले कोट्यवधी
Akshaye Khanna Movies: अक्षय खन्नाचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला होता. मात्र, दुसरा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
Akshaye Khanna Movies: बॉलिवूडमधील या अभिनेत्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र, 1997 साली आलेल्या चित्रपटाने मात्र या हिरोचे नशीब चमकले. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी त्याला ऑफर येऊ लागल्या. मात्र, हिट ठरलेल्या चित्रपटासाठी हा अभिनेता निर्मात्यांची पहिली पसंत कधीच नव्हता. सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या नकारानंतर या अभिनेत्याला तो चित्रपट मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकब्लास्टर ठरला. कोणता आहे हा सिनेमा आणि अभिनेता जाणून घेऊया.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधले काही भन्नाट किस्से सांगणार आहोत. अभिनेता अक्षय खन्ना तर तुम्हाला माहिती असेलच. सुपरस्टार अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असला तरी अक्षयचा पहिला सिनेना सुपरफ्लप ठरला होता. मात्र, एका चित्रपटाने त्याचे नशीब पूर्णपणे पालटले. अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट होता हिमालय पुत्र मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो दणकून आपटला होता. त्यानंतर त्याला दुसरा चित्रपट मिळाला खरा मात्र या सिनेमासाठी तो निर्मात्यांची पहिली पसंत नव्हता. या भूमिकेसाठी आधी सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण सारख्या सुपरस्टार्सना विचारले होते. मात्र, त्यांनी हा सिनेमा नाकारला होता.
चित्रपट निर्माते जेपी दत्ता यांचा बोर्डर सिनेमा आजही प्रेक्षकांना आठवतो. बोर्डर चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी अजिबात कंटाळा येत नाही. या सिनेमाने एक नव्हे तर अनेक कलाकारांचे करिअर सेट केले. हा एक मल्टी स्टारर चित्रपट होता. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धावर आधारित असलेल्या या सिनेमाना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.
या चित्रपटात सनी देओलने मेजर कुलदीप सिंग चांदपुरी, विंग कमांडर आनंदच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ, सहाय्यक कमांडंट कॅप्टन भैरो सिंग (बीएसएफ) म्हणून अक्षय खन्ना, नायब सुभेदार रतन सिंहच्या भूमिकेत पुनीत इस्सर, नायब सुभेदास मथुरा दासच्या भूमिकेत सुदेश बेरी आणि कुक हवालदार भगीरामच्या भूमिकेत कुलभूषण खरबंदा यांनी भूमिका साकारल्या होत्या. मात्र, या सिनेमातील अक्षय खन्नाच्या भूमिकेला सर्वाधीक प्रेम मिळाले.
सिनेसृष्टीत नव्याने पाऊल ठेवलेल्या अक्षय खन्नाचा हा दुसराच सिनेमा होता. पहिला चित्रपट हिमालय पुत्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट बॉर्डरला मात्र खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर ऑल टाइम ब्लॉकब्लास्टर म्हणून हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटातील अक्षय खन्ना धर्मवीर सिंह भान म्हणून देशभरात लोकप्रिय झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय खन्नाने साकारलेल्या भूमिकेसाठी निर्मात्यांना एखादा सुपरस्टारला कास्ट करायचे होते. जे.पी दत्ता यांनी सुरुवातीला सलमान खान याला विचारले होते. मात्र, सलमानने स्वतःच हा चित्रपट नाकारला. त्यानंतर दिग्दर्शकाने अक्षय कुमारला विचारले त्यानेही काही कारणास्तव हा चित्रपट करण्यास नकार दिला. सलमान आणि अक्षयनंतर जेपी दत्ता यांनी अजय देवगण यालादेखील विचारले होते. मात्र, त्यानेही चित्रपट नाकारले. शेवटी दिग्दर्शकाला नवोदित असलेल्या अक्षय खन्ना याला चित्रपटात घ्यावे लागले. मात्र, अक्षय खन्नाने ही भूमिका खूप चांगली साकारली आणि हिटदेखील केली.