अंगावर एकही कपडा नाही, फक्त गिटारनं झाकलं शरीर; अभिनेत्रीचा तो Video चर्चेत
ती आली तिनं पाहिलं आणि...
मुंबई : (Corona wave) कोरोना काळानंतर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. त्यातच दमदार कथानकाच्या अभावी तगडी स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांनी कलाकारांकडे पाठ फिरवली. असं असतानाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर जगभरातील विविधभाषी चित्रपट पाहण्याची संधी मिळाल्यामुळं प्रेक्षकांचा प्राधान्यक्रमही ओघाओघानं बदलला.
अभिनेता (aamir khan) आमिर खान, याच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासोबतही असंच काहीसं घडलं. एकिकडे चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी आणि दुसरीकडे ज्या चित्रपटावरून आमिरच्या चित्रपटाचा रिमेक साकारण्यात आला त्याची चर्चा, यामुळं laal singh chaddha बराच मागे पडला.
1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या Forrest Gump या चित्रपटावरून आमिरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची पटकथा लिहिली गेली. पण, इथं परफेक्शनिस्ट अभिनेत्याच्या चित्रपटाला प्रतिसाद मिळण्यापेक्षा बऱ्याच प्रेक्षकांनी Forrest Gump पाहण्याला प्राधान्य दिलं.
'फॉरेस्ट गम्प' आजही प्रेक्षकांच्या मनात कायम...
टॉम हँक्स, Robin Wright, मायकेल्टी विलियम्सन, सॅली फिल्ड आणि सहकलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या. हँक्स यांनी साकारलेला 'फॉरेस्ट गम्प' आजही प्रेक्षकांच्या मनातून उतरलेला नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं.
चित्रपटाच्या निमित्तानं त्यातील काही दृश्यांची पुन्हा चर्चा झाली. जिथं आमिरच्या चित्रपटामध्ये हॉलिवूडपटाप्रमाणे बोल्ड दृश्य नसतील असं सांगण्यात आलं, तिथेच 'फॉरेस्ट गम्प'मधील दृश्यही आक्षेपार्ह नसल्याचीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेल्या Robin Wright या एके ठिकाणी प्लेबॉयसाठी काम करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. एका दृश्यामध्ये त्या व्यासपीठावर गाण गाताना दिसल्या. प्लेबॉयचा संदर्भ असल्यामुळं Robin Wright म्हणजेच चित्रपटातील 'जेनी' (जिच्यावर फॉरेस्ट गम्पचा जीव जडलेला असतो) पाठमोरी बसली असून, ती विवस्त्र असल्याचं पाहायला मिळालं.
इथं जेनी पाठमोरी असून, तिनं शरीराचा कोणताही भाग दिसणार नाही, अशा पद्धतीत गिटार पडकल्याचं लक्षात येताच हे दृश्य अश्लील नाही हे अनेकांनाच पटलं.
चित्रपटाच्या कथानकाच्या ओघात हे दृश्यही फॉरेस्ट गम्प या व्यक्तीच्या मनाचा सच्चेपणा आणि त्याच्यासाठी जेनीचं समोर असणंही किती महत्त्वाचं होतं हेच सांगून गेलं. चित्रपट साकारताना त्यावेळी बरेच बारकावे टिपले गेले, त्यापैकीच हे दृश्यसुद्धा एक.
आमिरच्या चित्रपटामुळं चर्चेत आलेला Forrest Gump हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल, तर तुमच्या Watch List मध्ये तो Add करायला हरकत नाही.