मुंबई : भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेता आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आगे. त्यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाजपेयी यांच्या तब्बेतीबाबत जाणून घेण्यासाठी अनेक नेते एम्स येथे पोहोचले आहेत. देशभरात लोकं वाजपेयी यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना करत आहेत. वाजपेयी हे एक लोकप्रिय नेते होतेच त्याचसोबत ते एक जादूगर होते. त्यांची कविता आजही मनाला उभारी देते. वाजपेयी यांना वाचन, लिखाणाप्रमाणेच सिनेमा पाहण्याचा देखील छंद होता. बॉलिवूडमधील एक अभिनेत्री वाजपेयी यांना पसंद आहे. तिचं नाव आहे हेमा मालिनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली होती की, अटल बिहारी वाजपेयी हे त्यांचे मोठे प्रशंसक आहेत. हेमा मालिनीने गेल्या वर्षी मथुरा येथे एक कार्यक्रम केला होता. तिथे तिने याबाबत खुलासा केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी हेमा मालिनी यांचा सिनेमा जवळपास 25 वेळा पाहिला आहे. आणि तो सिनेमा आहे 1972 मध्ये प्रदर्शित झालेला सीता और गीता. 



या अभिनेत्रीला बघून काहीच बोलू शकले नाही वाजपेयी 


हेमा मालिनी यांनी याबाबतचा एक किस्सा सांगितला होता. एकदा मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं की, अटल बिहारी वाजपेयी यांचा मी अल्लेख केला. मात्र मी त्यांना कधीच  भेटले नाही. तेव्हा पार्टीचे पदाधिकारी मला भेटायला घेऊन गेले. मात्र नंतर मला लक्षात आलं की, अटल बिहारी वाजपेयी अगदी शांत होते. तेव्हा मी तेथील एका महिलेला विचारलं की, वाजपेयी यांची तब्बेत तर ठीक आहे ना तेव्हा ती म्हणाली की, वाजपेयी तुमचे खूप मोठे चाहते आहे. त्यांनी 1972 मधील सीता और गीता हा सिनेमा तब्बल 25 वेळा पाहिला आहे.