मुंबई : जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल्सपैकी एक लोकप्रिय फेस्टिवल असलेला कान्स फिल्म फेस्टिवलला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. कोरोनामुळे हे फिल्म फेस्टिवल पुढे ढकलण्यात आलं आहे. ७३ वे कान्स फिल्म फेस्टिवल हे १२ मे ते २३ मे या काळात आयोजित करण्यात आलं होतं. पण जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे या फेस्टिवलची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयोजक आता या फ्रेंच रिवेरा फेस्टिवलला जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीला आयोजित करतील. कान्स फिल्म फेस्टिवलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून १९ मार्च रोजी याबाबत ट्वीट करण्यात आलं आहे. त्यात लिहिलं आहे की, हेल्थ क्रायसेस आणि फ्रान्स आणि जगभरात सुरू असलेल्या या परिस्थितीमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 



फेस्टिवल साजरा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. सगळ्या संभाव्य गोष्टी तपासून पाहिल्या पण ते शक्य नाही. यामुळे हा फिल्म फेस्टिवल पुढे ढकलणं सर्वात महत्वाचं आहे. फ्रेंच आणि इतर देशातील लोकांची परिस्थिती पाहता हे पाऊल उचलणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे.