मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटींच्या रिअल लाईफ मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान आणि काजोलचं नाव लोकांच्या मनात पहिलं येतं. हे दोन स्टार्स जेव्हा-जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण यावेळी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त जिथे देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तिथे काजोलने त्याला शुभेच्छाच दिल्या नाहीत. आता दिवाळीच्या आधी, काजोलने ASK ME ANY THING या सत्रात Instagram वर तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. या सत्रात एका चाहत्याने तिला विचारलं की, 'तू शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा का दिल्या नाहीस?'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलने इंस्टाग्रामवर AMA सत्राद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. काजोलने इंस्टाग्रामवर लिहिलं, 'मी सगळ्यात मनोरंजक प्रश्नांची उत्तरे देईन. पुढे जा, विचारा!' यादरम्यान काजोलच्या चाहत्यांनी तिला तिचे वैयक्तिक आयुष्य, तिच्या शाळेतील दिवसांशी संबंधित अनेक प्रश्न विचारले आणि ती करण जोहरसोबत चित्रपट करण्यास तयार आहे की नाही हे देखील विचारलं.


का नाही केलं शाहरुखला विश
या सगळ्या प्रश्नांदरम्यान, सर्वांचं लक्ष वेधून घेतलेला एक प्रश्न म्हणजे शाहरुख खानशी संबंधित आहे, 2 नोव्हेंबर शाहरुखने आपला वाढदिवस साजरा केला. एका चाहत्याने त्याला विचारलं, 'तु शाहरुखला विश का केलं नाही?' याचं उत्तर काजोलनं एका व्हिडीओद्वारे दिलं आहे, 'मी त्याला आणखी काय शुभेच्छा देऊ? मुलगा आर्यन खान घरी परतल्यावर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असं मला वाटतं. काजोलचं हे उत्तर एकून तिचे चाहते तिचं कौतुक करत आहेत.