Gadar 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! ओलांडणार कमाईचा 300 कोटींचा गल्ला
Gadar 2 Box Office Collection Day 7: `गदर 2` या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केले असून आता पुन्हा एक नवा रेकॉर्ड करताना सनी देओल दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट 300 कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर करणार आहे.
Gadar 2 Box Office Collection Day 7: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये अनेकांना मागे टाकले आहे. मात्र, सात दिवसांनंतर 'गदर 2' नं एक नवा रेकॉर्ड मोडला आहे. 'गदर 2' नं केलेल्या या नवा रेकॉर्डनं सगळ्यांना आनंद झाला आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकरनुसार, 'गदर 2' नं सातव्या दिवशी 22 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटानं भारतात केलेल्या या कमाईनंतर आता त्याची एकूण कमाई ही 284.58 कोटी झाली आहे. हे आकडे पाहता 'गदर 2' भारतात लवकरच 300 कोटींचा आकडा पार करणार असे म्हटले जात आहे. चित्रपटाला आता फक्त 16 कोटींची गरज आहे त्यानंतर 'गदर 2' 300 कोटींच्या कलेक्शनमध्ये असलेल्या चित्रपटांचा एक भाग असेल. पहिल्या दिवशी चित्रपटानं 40.10 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 43.08 कोटी झाला. तिसऱ्या दिवशी हा आकडा वाढला असून 51.70 कोटींचा गल्ला त्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केला. चौथ्या दिवशी चित्रपटानं 38.70 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली आणि 55.50 कोटींचा गल्ला चित्रपटानं केला आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट होऊन आकडा 33.50 कोटींचा झाला आणि काल चित्रपटानं 22 कोटींची कमाई केली आहे.
'गदर 2' या चित्रपटाविषयी आणखी बोलायचं झालं तर त्याचा बजेट हा 80 कोटींचा असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट चांगलाच हिट झाला आहे. यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटामध्ये 'पठाण'नंतर 'गदर 2' हाच चित्रपट आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. तब्बल 22 वर्षांनी आलेल्या या चित्रपटावर प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.
हेही वाचा : सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर 'या' प्रसिद्ध कलाकारांना होती 'गदर' चित्रपटाची ऑफर!
दरम्यान, 'गदर 2' सोबत प्रदर्शित झालेल्या 'ओएमजी 2' या चित्रपटाला 100 कोटी बॉक्स ऑफिस करणं कठीण जात आहे. सातव्या दिवशी 'ओएमजी 2' नं 5.25 कोटींचा गल्ला केला आहे. तर 'ओएमजी 2' चित्रपटाच्या संपूर्ण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 21.62 टक्क्यांची घट झाल्याचे म्हटले जाते. 'ओएमजी 2' चित्रपटानं आतापर्यंत एकूण 84.72 कोटींचा गल्ला केला आहे. तर त्याला आता फक्त 16 कोटींची गरज असून त्यानंतर चित्रपट 100 कोटींच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये एन्ट्री करेल.