मुंबई : गणेश चतुर्थीचा सण म्हणजे बाप्पासाठी मोदक, गोड-धोड आणि चमचमीत पदार्थांची चंगळ. अकरा दिवस बाप्पाला स्वादिष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा असते आणि नवनवीन पदार्थ बनवण्यासाठी झी मराठी वाहिनीवरीलआम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील सुगरण गृहिणींना मदत करत आहे. गणेश चतुर्थी निमित्त आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये खमंग पदार्थांचा बेत असणार आहे आणि यामध्ये  काही खास पाहुणे मंडळी सुद्धासामील होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आठवड्यात आम्ही सारे खवय्येच्या किचन मध्ये कलाकारांची रेलचेल असणार आहे. गणपती आगमनाच्या विशेष भागात भारत गणेशपुरे त्यांच्या घरच्या गणपतीच्या आठवणी सांगणार आहेत. अनेक मालिकांमधील वेगवेगळ्याभूमिका ते चला हवा येवू द्या पर्यंतचा रंजक प्रवास नेमका कसा घडत गेला याचा उलगडा श्रेया बुगडे एका विशेष भागात करणार आहे आणि या भागात श्रेया सोबत तिची आई देखील सहभागी होणार आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार याकार्यक्रमात सहभागी होताना कुटुंबापासून दूर राहावं लागलं आणि त्यावेळचे किस्से अभिनेता योगेश शिरसाट आणि त्याची पत्नी सोनम शिरसाट शेअर करणार आहेत.


अगदी लहानपणापासून कलेची आवड असलेल्या तुषारने तीआवड जपून त्याचं व्यावसायिक रुपांतर कसं केलं याचा उलगडा तुषार देवल आणि त्याची पत्नी स्वाती देवल करणार आहेत. डिजिटल युगाला पत्रांच्या जादुई दुनियेत घेवून जाणाऱ्या अरविंद जगताप यांनी गाव ते मुंबई हा प्रवासकसा सुरु झाला हे सविस्तर पणे या विशेष भागात मांडणार आहेत. तेव्हा खमंग पदार्थांची आणि कलाकारांची रेलचेल पाहायला विसरू नका आम्ही सारे खवय्ये गणेशोत्सव विशेष भागात १२ ते २० सप्टेंबर दुपारी २ वाजता फक्त झी मराठीवर!!!