गणपती बाप्पाचे आगमन झी युवा वर!!
सगळीकडे गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच झी युवा या वाहिनीच्या विविध मालिकांमध्ये गणपतीचे आगमन होणार आहे.
मुंबई : सगळीकडे गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच झी युवा या वाहिनीच्या विविध मालिकांमध्ये गणपतीचे आगमन होणार आहे.
फुलपाखरू, अंजली, जिंदगी नआऊट आणि गर्ल्स हॉस्टेल या मालिकांमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि त्यासाठी अगदी जय्यत तयारी सुरू आहे . फुलपाखरू मध्ये मानस च्या घरी गणपती येणार आहे आणि त्यासाठी सगळेच गणपतीच्या तयारीत मग्न झाले आहेत.
अंजली मालिकेमध्ये हॉस्पिटल मध्ये गणपती बाप्पा येणार आहे. आणि संपूर्ण हॉस्पिटल परिवार आनंदाने गणपतीची भक्ती करणार आहेत. जिंदगी न आउट मध्ये सुद्धा सचिन च्या घरातील सर्वच मंडळी जोमाने तयारी करत आहेत. गर्ल्स हॉस्टेल मधील अनिष्ट टाळण्यासाठी सगळ्या मुली गणेशाच्या मूर्तीची स्थापना करणार आहेत.
गणेशोत्सवात सर्वच कलाकारांना सुट्टी देण्यात आली आहे. झी युवाच्या कलाकारांसाठी सुद्धा दोन्ही वेळच्या आरतीला घरी राहण्याचा आनंद देणे हे वाहिनीचे यामागचे उद्दिष्ट्य होते. अंजली मालिकेतील अंजली म्हणजेच सुरुची अडारकर म्हणाली, "माझ्या घरी गणपती येत नाही पण आमच्या कुटुंबातील गणपतीसाठी, पहिल्या दिवशी आम्ही २१ उखडीच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवतो. थर्माकॉल किंवा पुठ्ठ्याचे डेकोरेशन न करता अगदी साध्या पद्धतीने गणपतीची आरास केली जाते. घरातचं उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रीक तोरणांनी सजावट करतो."
फुलपाखरू मालिकेतील वैदेही म्हणजेच ऋता दुर्गुळे म्हणाली कि, "घरात गणपती येणे या पेक्षा कोणतेच सुख नसते. आमचा गणपती ठाण्यात माझ्या काकांकडे येतो. २० जणांचे आमचे एकत्र कुटुंब त्या एका घरात राहते. सर्वजण अतिशय भक्तिभावाने गणपतीची पूजा करतो. गणपतीतमध्ये संपूर्ण कुटुंब गप्पा टप्पा करत संपूर्ण रात्र जागवतो. लालबाग च्या राजाची प्रतिकृती हे दुर्गुळे कुटुंबाच्या गणपतीचे वैशिष्ठ आहे".
फुलपाखरूमधील मानस म्हणजेच यशोमान आपटे कडे सुद्धा दीड दिवसाचा गणपती येतो. "आम्ही अतिशय सुंदर तर्हेने गणपतीचा मखर सजवतो. आपटे कुटुंबाचा गणपती हा नेहमीच सजावटे साठी विले पार्ले मध्ये प्रसिद्ध आहे". लव्ह लग्न लोचा या मालिकेतील विवेक सांगळे, समिहा सुळे, सिद्धी कारखानीस आणि श्रीकर पित्रे यांच्याकडे गणपती येतो तर गर्ल्स हॉस्टेलमध्ये सुद्धा ध्यानलक्ष्मी म्हणजेच दीपश्री कडे गणपती येतो.