Shreyas Talpade : गणेशोत्सव हा सण असा आहे की प्रत्येक वर्षी भक्त हे गणपती बाप्पाची आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. गणपती बाप्पाचे आगमन झाले की ते दिवस कसे निघून जातात आणि अनंत चतुर्थी येते काही कळतच नाही. कारण त्या काळात असलेली सकारात्मक उर्जा आणि उत्साहाचं वातावरण आपण कोणी विसरू शकत नाही. सगळ्यांना आपल्या परिसरात असलेल्या गणपती मंडळाचे दर्शन घ्यायचे असते. अनंत चतुर्थीला हा आनंद दु:खात बदलतो. कारण आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा हे त्यांच्या घरी जात असतात. पण तुम्हाला माहितीये का काही लोक गणपती बाप्पाची एकच मूर्ती ठेवतात आणि तिचं मूर्ती पुढच्यावर्षी देखील स्थापन करतात. त्यापैकी एक मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या गणपतीच्या आठवणी सांगितल्या आहेत. श्रेयसनं त्याच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. त्याच्या घरातल्या गणपतीची उत्तरपूजा झाली की, ते भावाच्या घरी गणपतीसाठी जातात. गेल्या तीन वर्षांपासून तो त्याच्याच घरच्या गणपतीचं प्रतिकात्मक विसर्जन करतो. त्याविषयी श्रेयसनं सांगितलं होतं की 'बाप्पा घरी येणार हे माहित होतं तेव्हा माझी मुलगी आद्या खूप खुश व्हायची. ती आताही तितकीच आनंदी असते. ती तीन वर्षांची असताना तिला विसर्जनाविषयीही कुतूहल होतं. आम्ही बाप्पाचं घरीच विसर्जन करणार असल्यानं सगळी तयारी सुरु होती. अशात आद्यानं शेजारच्यांकडे गणपती विसर्जन पाहिलं. ते पाहिल्यानंतर आद्या रडू लाहली आणि तिनं हट्ट धरला की आपला बाप्पा पाण्यात बूडवायचा नाही. तेव्हा आम्ही गुरुजींना विचारलं आणि तेव्हापासून आम्ही उत्तरपूजा आणि मग प्रतिकात्मक विसर्जन करतो. आमच्या घरातील बाप्पाची मूर्ती ही शाडूची असते आणि दरवर्षी आम्ही त्या मूर्तीला नवा रंग देतो आणि त्याची पूजा करतो. तर वर्षभर ती मूर्ती आमच्या घरी राहते.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : जेव्हा शाहरुख खाननं गौरीला सांगितलं बुरखा घाल अन् नमाज...


पुढे शाळा आणि कॉलेजच्या काळातील गणेशोत्सवाविषयी सांगताना श्रेयस म्हणाला की 'तेव्हा आम्ही रात्री लालबागचा राजा, गणेशगल्ली अशा मंडळांना भेट द्यायचो. खूप गर्दी, लांबच लांब रांगा असायची. पण त्यावेळी मी रात्रभर रांगेत उभं राहून दर्शन घ्यायचो. कधी कधी सकाळ व्हायची तरी दर्शन होत नव्हतं. लालबागच्या राजाबद्दलची विशेष आठवण म्हणजे माझा पहिला हिंदी चित्रपट 'इक्बाल' प्रदर्शित झाला, तेव्हा मला लालबागला बोलावलं होतं. राजाच्या चरणी माझा सत्कार करण्यात आला. कधीकाळी रांगेत उभं राहून दर्शन मिळेल की नाही याची खात्री नसायची पण आता तिथं गेलं की नक्कीच दर्शन मिळतं. हा सगळा प्रवास बाप्पाच्या आशीर्वादानंच झाला आहे. यंदा पहिल्यांदा मी माझ्या मुलीला म्हणजे आद्याला राजाच्या दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. बाप्पाती इतकी मोठी मूर्ती पाहिल्यानंतर तिचा आनंद आनंद हा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.'