मुंबई : 'गँग्स ऑफ वासेपूर' हा बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अभिनेता आणि लेखक झीशान कादरी ( Zeishan Quadri ) कायदेशीर अडचणीत अडकला आहे. मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात झीशानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिल्म फायनान्सर आणि निर्माती शालिनी चौधरी यांनी हा तक्रार दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्यावृत्तानुसार, शालिनी यांनी आरोप केला आहे की झीशाननं सोनी टीव्हीच्या स्पेशल शोसाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे. यानंतर झीशाननं शालिनी यांची ऑडी कार वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर झीशाननं शालिनी यांच्या फोनला उत्तर देणं बंद केलं. तर थोड्या दिवसात शालिनी यांना कळलं की झीशाननं त्यांची महागडी ऑडी कार अवघ्या 12 लाख रुपयांना विकली.



शालिनी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आणि त्यांची मंजूरी न घेता त्यांचीच महागडी कार विकल्याबद्दल झीशानला नंतर अटक करण्यात आली. 'इंडिया टुडे'शी बोलताना शालिनी म्हणाल्या, 'झीशान कादरीसोबत माझी पहिली भेट 2017 मध्ये झाली होती. तो सोनीसाठी क्राईम पेट्रोलची निर्मिती करत असल्यानं त्याला पैशांची गरज होती. त्यांची तथाकथित पत्नी श्रीमती प्रियांका बस्सी या देखील बिझनेस पार्टनर होत्या. क्राईम पेट्रोलशिवाय आम्ही ‘हलाहल’ चित्रपटातही पैसे गुंतवले होते. त्यानंतर माझा झीशानवर थोडा विश्वास बसू लागला आणि त्याचा हा परिणाम झाला.'


ऑडी कार घेतल्यानंतर झीशान आणि प्रियांकानं त्यांचे फोन घेणं बंद केल्याचा आरोप शालिनीनं केला आहे. यानंतर त्यांना कळलं की झीशाननं त्यांच्या ऑडीची बनावट कागद बनवून १२ लाख रुपयांना विकली होती. याबाबत शालिनीनं त्याला विचारणा केली असता, झीशाननं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. शालिनीचा दावा आहे की झीशाननं आपल्या ओळखीचा वापर करून तक्रार नोंदवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. शालिनी यांनी असेही सांगितले की, झीशानच्या वकिलांनीही त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले.