गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला `Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...`
Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे.
Lawrence Bishnoi To Salman Khan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याने 1998 मध्ये राजस्थानमध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार (Blackbuck Case) केली होती, असा आरोप करण्यात येतो. आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर सलमानला 6 दिवस जोधपूर तुरुंगात रहावं लागलं होतं. त्यावेळी बिश्नोई समाजाने सलमानला कोर्टात खेचलं होतं. त्यानंतर सलमानला धमक्या येत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. अशातच आता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने सलमान खानला खुलेआम (Lawrence Bishnoi warns Salman Khan) धमकी दिली आहे.
काय म्हणाला Lawrence Bishnoi ?
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे. (Gangster Lawrence Bishnoi warns Salman Khan of consequences if he does not apologise to bishnoi community in blackbuck case)
'आमच्या समाजाचे जे मंदिर आहे तिथं येऊन सलमानने माफी मागायला हवी. जर आमचा समाज त्याला माफ करेल तर मी काहीच करणार नाही, असं लॉरेन्स बिश्नोई म्हणाला आहे. आमचा समाज सलमानवर नाराज आहे, त्यानं आमचा अपमान केलाय. त्यानं आता देखील माफी मागितली नाही तर मग परिणाम भोगायला त्यानं तयार रहावं, असं म्हणत जेलमध्ये दिलेल्या या मुलाखतीत बिश्नोईने सलमानला थेट धमकी (Lawrence Bishnoi warns Salman Khan) दिली आहे.
पुढे बोलताना लॉरेन्सने धमकीचं पत्र आपण पाठवलं नसल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधी माझी चौकशी केली होती. पण मी ते पत्र पाठवलं नव्हतं, असा खुलासा त्याने या मुलाखतीत केला आहे.
सिद्धू मुसेवाला याला का मारलं?
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावर बोलताना बिश्नोईने खुलासा केलाय. भावाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचं खुलासा बिश्नोईने केला आहे.