मुंबई : "कहते है कमाठीपुरा मे कभी अमावस की रात नही होती...क्यू की वहा गंगू रहती है'', असं दमदार ताकतीच्या डायलॉगने या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. अभिनेत्री आलिया भटच्या आगामी सिनेमाचा हा टीझर आहे. आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टीझरचे संवाद जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकले तर तुम्हाला नक्की वाटेल की, या सिनेमाच्या डायलॉगमध्ये चांगलाच दम आहे. गंगूबाई काठियावाडी ही व्यक्ती नेमकी कशी होती याचा अंदाज तुम्हाला येईल, म्हणजेच जे दिग्दर्शकाला दाखवायचं होतं, ते दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.


टीझरची सुरुवात एका दमदार संगीताने होते, यावरुन सिनेमातील अनेक दृश्य आपल्याला असेच पाहायला मिळतील असा अंदाज आहे.


या सिनेमातील संवाद दमदार असतील असं खालील संवादावरुन वाटतं...


"गंगू जहाँ थी, और जहाँ थी, रहेगी"
"इज्जत से... जिने का"
"किसी से नही डरने का, ना पुलीस से, ना एमएलएसे, ना मंत्री से, ना किसी के बाप से नही डरने का"
"जमीन पे बैठी बहोत अच्छी लग रही है तू, आदत डाल ले, क्यो की तेरी कुर्सी तो गई"
"मैं गंगुबाई प्रेसिंडेंट कामाठीपुरा, कुँमारी आप ने छोडा नही, और श्रीमती किसी ने कभी बनाया नही"

या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. येत्या 30 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.या सिनेमात आलिया गंगूबाईच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे...


या सिनेमाच्या टीझरमध्ये आलियाचा कधीही न पाहिलेला अंदाज समोर आलाय. या सिनेमात आलिया रावडी लूकमध्ये दिसतेय. आलियाची दमदार चाल, तिचा भारदस्त आवाज आणि दमदार अभिनय यावरुन तिने भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचं दिसून येतंय. 


संजय लिला भन्साळी दिग्दर्शित सिनेमात आलिया कामाठीपुरा इथल्या वैश्या व्यवसायात दबदबा असलेल्या गंगूबाईची भूमिका साकारणार आहे..या सिनेमातून गंगूबाईंचा संघर्षमय प्रवास पाहायला मिळणार आहे...ईनोसंन्ट आलियानं पहिल्य़ांदाच अशी रावडी भूमिका साकारल्यानं चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाची थाप पडतेय...


आलिया भट्टने 'गंगूबाई काठीयावाडी' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. संजय लिला भंन्साळी यांच्या वाढदिवसाचं निमीत्त साधून आलियाने सिनेमाचा टिझर तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.


दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.आलियाने शेअर केलेल्या टिझरला अवघ्या काही तासातच दोन लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. तर अनेकांनी आलियाच्या अभिनयाचं कौतुक देखील केलं आहे.