Gauhar Jaan: हिरामंडी सिरीजची देशभरात चर्चा झाली. यामुळे तफवायफ कोण असतात? त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याशी कसा संबंध आला? ही सर्व कहाणी 'हिरामंडी'तून आपण पाहिली असेल. तो असा काळ होता जिथे मानवी सभ्यतेच्या विकासाबरोबर गायनाचे जग भरभराटीला आले आहे. काळ बदलला, पद्धती बदलल्या आणि माध्यमांसोबत गायनाने नवे रूप घेतले. सुमारे 100 वर्षांपूर्वी गायनाच्या जगात रेकॉर्डिंगचा ट्रेंड वाढला होता. या काळातच जन्म होत होता एका सुपरस्टार गायिकेचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील अशी सुपरस्टार गायिका जिचा मधुर आवाज पहिल्या रेकॉर्डिंग टेपमध्ये कैद केला. देशातील पहिले रेकॉर्ड केलेले गाणे 1903 मध्ये रिलीज झाले होते. या प्रसंगाला आता साधारण 111 वर्षे झाली. या शंभरीत रेकॉर्डिंगचे जग झपाट्याने बदलले. म्युझिक इंडस्ट्री विकासाच्या शिखरावर आहे. पण त्याकाळी रेकॉर्डिंगला आवाज देणारी तत्कालीन सुपरस्टार गायिका गौहर जान आजही साऱ्यांच्या आठवणीत आहे.


शोसाठी 3,000 रुपये फी 


गौहर जान या गायनाच्या दुनियेतील असा एक चमकता तारा होत्या.  त्यांचा आवाज मृत्यूच्या 96 वर्षांनंतरही लोकांच्या कानात गुंजतोय. गौहर जान या गायनाच्या दुनियेत इतक्या मोठ्या सुपरस्टार होत्या याचा एका उदाहरणातून अंदाज लावता येऊ शकतो. जेव्हा सोने 20 रुपये किलो इतक्या किंमतीने विकले जायचे त्या काळात गौहर जान त्यांच्या शोसाठी 3,000 रुपये फी आकारायच्या. गौहर जान जिथे जात तिथे सोन्या-चांदीचा पाऊस पडायचा. त्यांचे अनेक चाहते होते. जे त्यांच्यावर पैसे, सोन्या चांदीची उधळण करायचे. 


वेश्यालयात संगीताचे प्रशिक्षण


गौहर यांच्या आवाजात एवढी जादू होती की मोठमोठे राजे-सम्राटही त्यांच्यासमोर अक्षरश: वेडे व्हायचे. विशेष म्हणजे गौहर जानने वेश्यालयात संगीताचे प्रशिक्षण घेतले आणि येथे सराव करून आपल्या आवाजाची जादू संपूर्ण शहरावर केली. त्यांच्या या आवाजामुळे गौहर जान बॉलिवूडच्या पहिली महिला करोडपती झाल्या. गौहर जान या अशा एकमेव कलाकार आहेत ज्यांच्याकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी मदत मागण्यासाठी पोहोचले होते.


देशातील पहिले गाणे रेकॉर्ड


18 वर्षात 600 हून अधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गौहर जान यांचा जन्म 26 जून 1873 रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड शहरात झाला. गौहर यांचे वडील आर्मेनिया येथे राहणारे होते. गौहर यांच्या आईचे नाव व्हिक्टोरिया होते. गौहर यांच्या वडिलांनी आईला सोडले. यानंतर त्यांच्या आईने खुर्शीद नावाच्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले. 


सर्वोत्तम संगीत शिक्षकांकडून प्रशिक्षण 


गौहरची आई वेश्यालयात मैफील भरवत असे. येथे रोज संध्याकाळी निवांत वातावरणात संगीत होतं. गौहर जान यांनी वेश्यालयातच आपल्या आईकडून संगीत प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. लहानपणापासूनच सुरांची मल्लिका असल्यामुळे गौहर यांना त्यांच्या आईने देशभरातील सर्वोत्तम संगीत शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले.