मुंबई : झी मराठीच्या "चला हवा येऊ द्या" हा झी मराठी वाहिनीवरील शो दर सोमवार मंगळवारी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतो. हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येताच शो ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, निलेश साबळे, भारत गणेशपुरे या कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या कार्यक्रमात दर आठवड्यात पाहुणे कलाकार त्यांच्यां प्रमोशनसाठी येत असतात. आत्तापर्यंत या कार्यक्रमात बऱ्याच मान्यवरांनी हजेरी लावली आहे. कधी मालिकेच्या टीमने तर कधी सिनेमाच्या टीम या सेटवर पोहचल्या आहेत. मात्र या आठवड्यात या सेटवर एक वेगळ्या पाहुण्याने हजेरी लावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीच्या "चला हवा येऊ द्या" च्या मंचावर नेहमी हास्याचे कारंजे उडतच असतात व ह्या कार्यक्रमाची टीम प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडते. आता प्रेक्षकांसाठी एक खास बातमी म्हणजे येणाऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ह्या कार्यक्रमात गौर गोपाळ दास ह्यांचे आगमन होणार आहे. गौर गोपाळ दास ह्यांचा बद्दल सांगावं तितकं कमीच आहे, हे एक असं व्यक्तीमत्व आहे जे जीवनशैली कशी सकारात्मक असावी त्या बद्दल  ते प्रेरणात्मक विचार मांडत असतात. 


त्यांच्या आगमनाची झलक प्रेक्षकांनी प्रोमो मध्ये पाहीलीच आहे. मनोरंजनाबरोबरच आयुष्य खुप सुंदर आहे. या विषयी सांगताना गौर गोपाल दास आपल्याला खळाळून हसवतील व त्यातून आपल्याला बोधही मिळेल यात काहीच शंकाच नाही. तेव्हा  पहायला विसरू नका "चला हवा येऊ द्या" सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठी वर.


येत्या सोमवारी आणि मंगळवारी हा एपिसोड आपल्याला झी मराठीवर पाहता येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून असो किंवा कार्यक्रमातून असो गौर गोपाळ नेहमीच आपले प्रेरणात्मक विचार मांडत असतात. त्यांचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


गौर गोपाळ यांचा जन्म भारतातील महाराष्ट्र राज्यात 1973 मध्ये झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण सेंट ज्युड हायस्कूल, देहूरोड, पुणे येथून पूर्ण केलं. ते कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणेमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पुर्ण केला  त्यानंतर  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून कामही केलं.   १९९६ मध्ये ते इस्कॉनमध्ये सामील झाले.   लाइफ्स अमेझिंग सिक्रेट्स या नावाचं पुस्त त्यांनी प्रकाशित केलं.  युट्यूबरवर त्यांचे  2 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत.