Gaurav More on Mahaashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून अभिनेता गौरव मोरे ओळखला जातो. गौरव मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून घराघरात पोहोचला. गौरव मोरे हा नेहमीच आपल्या हसतांना आणि हसवतांना दिसतो. काही लोक नियमानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका पाहतात. बऱ्याचवेळा अनेकांना प्रश्न पडतो की नेहमीच विनोद हे गौरव मोरेवर असतात. त्याचा सतत अपमान होतो असे त्याच्या चाहत्यांना नेहमीच वाटत असते. आता गौरव मोरेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यावर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरवनं नुकतीच ‘बीबीसी न्यूज मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत गौरवला महाराष्ट्राची हास्यजत्रेत त्याच्या सतत होणाऱ्या अपमानावर विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देत गौरव म्हणाला, 'माझा होत असलेला अपमान हा मी एण्जॉय करत असतो. खरं सांगायचं झालं तर मी ते सगळं खूप एण्जॉय करत असतो. कधी कधी कोणत्या स्किटमध्ये माझा अपमान कमी झाला, अजून एखादा विनोद माझ्यावर हवा असं मी स्वतःहून सांगतो. वनिता आणि मी बऱ्याचदा एकत्र स्किट करतो. खरात काकुंच्या स्किटवेळी मी स्वतः तिला सांगतो की, मी तुझ्या जवळ आल्यानंतर तू मला जोरात मार. वनितालाही ते करतााना मजा वाटते.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


गौरवचे लाखो चाहते आहेत. गौरव सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. गौरवरचे इन्स्टाग्रामवर 242K फॉलोवर्स आहेत. तर काही दिवसांपूर्वी गौरवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत गौरव हा शिर्डीत (Shirdi) महापशुधन एक्स्पोच्या निमित्तानं शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमात गौरव हा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि दुसऱ्या एका व्हिडीओत सुदेश भोसले यांच्या सोबत डान्स करताना दिसला. त्यांचा हा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. 


हेही वाचा : ...म्हणून Riteish Deshmukh ला जंटलमेन म्हणतात! विमानतळावर छोट्या चाहत्याबरोबरच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं...


गौरव हा एक उत्तम विनोदवीर आहे असं म्हणायला हरकत नाही. तो त्याच्या संपूर्ण टीमसोबत खूप चांगल्या प्रकारे सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करता दिसतो. तर गौरव मोरेसोबत या कार्यक्रमात समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात दिसतात. हे सगळेच त्यांच्या विनोदांनी सगळ्यांना हसून हसून वेड करतात असं म्हणायला हरकत नाही. कारण आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या घरी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा रोजचा फॅमिली टाईम असतो.