गौरी अलका पगारे ठरली `झी मराठी` `सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३` महाविजेती
`झी मराठी` वाहिनीवर `सा रे ग म प लिटिल चॅम्प्स`२०२३ चा महाअंतिम सोहळा शनिवार २५ नोव्हेंबरला पार पडला. कोपरगावची गौरी अलका पगारे हे लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या `गौरी अलका पगारेने` विजेती होण्याचा मान पटकावला.
मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवर 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'२०२३ चा महाअंतिम सोहळा शनिवार २५ नोव्हेंबरला पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या 'गौरी अलका पगारेने' विजेती होण्याचा मान पटकावला.
गौरीची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला १,५०,००० चा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी १,००,००० चा धनादेश देण्यात आला. गौरी सा रे ग म प लिटिल चॅम्पस महाअंतिम सोहळ्याची विजेती झाल्याने महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग तिचं अभिनंदन करत आहे.
महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती गौरी अलका पगारे, प्रथम उपविजेता ठरली मुंबईची श्रावणी वागळे व द्वितीय उपविजेते पद जयेश खरेला मिळाले. मृण्मयी देशपांडे हिच्या सूत्रसंचालनाने ह्या पर्वाला अजूनच बहार आली आणि हा महाअंतिम सोहळा देखील अगदी दिमाखात पार पडला. गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे उत्तमरित्या परीक्षकाची भूमिका सांभाळली. एकूण काय तर 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच' हे पर्व स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय होतं.या नव्या पर्वाची गुरुकुल ही थीम प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. तर या संपूर्ण गुरुकुलची जबाबदारी सुरेश वाडकर सांभाळताना दिसले.
गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पस विजेतेपद देण्यात आलंय. सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. गौरी मूळची कोपरगावची असून अत्यंत खडतर परिस्थितीतून लहान वयातच तिने गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं. या पर्वाचा महाअंतिम सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आणि चाहते खूपच उत्सुक होते. हा सोहळा पार पडताच गौरीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.