सोशल मीडियावर फोटो शेअर करायला गौरी खानला वाटते `या` व्यक्तीची भीती
प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील खास क्षण कॅमेर्यामध्ये कैद करतात आणि त्या आठवणीच्या स्वरूपात सोशल मीडियावर शेअर करतात.
मुंबई : प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील खास क्षण कॅमेर्यामध्ये कैद करतात आणि त्या आठवणीच्या स्वरूपात सोशल मीडियावर शेअर करतात.
यामध्ये अनेक सेलिब्रिटीदेखील आहेत. अशांपैकी एक म्हणजे गौरी खान.
मित्रमैत्रीणींसोबतचे किंवा तिचे नातेवाईकांसोबतचे अनेक फोटो गौरी सोशल मीडीयाद्वारा फॅन्ससोबत शेअर करते. नुकताच किंग खानच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीचे सात दिवसांनंतर विसर्जन झाले. त्याचे फोटोदेखील गौरीने शेअर केले. पण यामध्ये त्यांचा मुलगा आर्यन खान दिसत नव्हता. याचे कारणही तितकेच खास आहे. आयर्नला त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय फोटो शेअर करणं पसंद नाही.
नुकताच गौरीने एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये 'मी हा फोटो आर्यनच्या परवानगीशिवाय शेअर करते आहे. यानंतर तो मला ओरडणार नाही अशी अशा करते.' अशी कॅप्शन गौरीने लिहली होती.
लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आर्यन हुबेहुब शाहरूख प्रमाणे दिसतो. त्यामुळे लोकांच्या मनात त्याच्या करिअरविषयी खूप उत्सुकता आहे. नेमक्या कोणत्या चित्रपटातून आणि कोणासोबत आर्यन चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार याकडे सार्यांचे लक्ष आहे.