Gautami Patil Viral Video : सबसे कातील गौतमी पाटील! अख्खा महाराष्ट्राला जिच्या नृत्याने वेड लावलं आहे. तिच्या एका कार्यक्रमातील कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ माजली. या प्रकरणावर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना दखल घ्यावी लागली. एवढंच नाही तर पोलिसांनीही या प्रकरणाची नोंद घेतली. झालेला प्रकार अतिशय धक्कादायक आणि विचित्र होता पण त्यावर आजपर्यंत गौतमी पाटील काहीच बोलली नव्हती.  तर तिचे कार्यक्रमही थांबले नाही. ते त्याच जोशाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आपल्या नृत्याने लोकांना वेड लावतं आहे. 


''तो Video आईला पाठवला अन् मग...''


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालेला प्रकाराने सगळ्यांच धक्का बसला होता. पण गौतमी पाटील या व्हिडीओमुळे झालेला मानसिक त्रासाबद्दल ती पहिल्यांदाच बोलली. त्या प्रसंगाबद्दल सांगताना गौतमी म्हणाली की, ''जेव्हा हा व्हिडीओ समोर आला एक क्षण मला काय करावं कळत नव्हतं. मग मी सगळ्यात पहिले हा व्हिडीओ माझ्या आईला पाठवला.'' हे करण्यामागचं कारणही तिने सांगितलं. ती म्हणाली की, ''हा व्हिडीओ जर आईला कोणी दुसऱ्याने पाठवला तर तिला धक्का बसला असता. म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मीच तिला तो व्हिडीओ पाठवला.'' हे सगळं सांगताना गौतमीच्या डोळ्यात पाणी आलं. 


''त्याने हा व्हिडीओ काढला...?''


खरं तर तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी डिप्रेशनमध्ये गेली होती, असंही तिने सांगितलं. 
ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ व्हायरल त्याचाही गौतमीने चांगलाच समाचार घेतला. ''त्याला माझी प्रसिद्धी पाहावली नाही की माझं शो बंद करायचं होतं की दुसरं काही कारणं होतं माहिती नाही.  पण या प्रकारातून त्याची मानसिकता किती खराब आहे हे समजते.''


पूर्णपणे खचून गेली होती...


''या व्हिडीओनंतर माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडल्या पण त्या सर्वच सांगू शकतं नाही. पण असं वाटलं आता सगळंच बंद. मी पूर्णपणे खचून गेली होती. पण माझ्या पोरी, माझ्या आईने मला आधार दिला आणि यातून बाहेर काढलं. ''


''पहिल्या शोच्या वेळी...''


''या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी कशीबशी सावरली आणि पहिल्या शोच्या वेळी एन्ट्री करताना मला धीर होत नव्हता. परत कोणीतरी कंमेट्स करेल, मला नको ते बोलेल...पण आयोजक आणि माझ्या महाराष्ट्रातील चाहत्यांमुळे मी पुन्हा उभी राहिली. ''



एका युट्युब चॅनेलला गौतमी पाटीलने मुलाखत दिली. त्यात तिने त्या व्हिडीओबद्दल सांगितलं. @theoddEngineer या युट्युब चॅनेलने ही मुलाखत घेतली आहे.