`नको यांना या मुलींना धंद्याला लावू..`, `..एवढी तरी अक्कल..`; गौतमीच्या `त्या` कृतीने चाहत्यांचा संताप
Gautami Patil troll after viral video : गौतमी पाटीलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, तर त्यात लहान मुलींसोबत डान्स केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.
Gautami Patil troll after viral video : डान्सर गौतमी पाटीलचे लाखो चाहते आहेत. तिचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यात फक्त छोटे कार्यक्रम नाही तर मोठ-मोठ्या कार्यक्रमात देखील तिला बोलवण्यात येते. इतकंच नाही तर गौतमी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. त्यातील एक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
गौतमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती काही मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ शेअर करत तिनं हात जोडण्याचं इमोजी शेअर करत हसण्याचं इमोजी कॅप्शनमध्ये दिलं आहे. या व्हिडीओत गौतमी त्या मुलींसोबत मज्जेत डान्स करताना दिसते. तर दुसरीकडे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
पाहा व्हिडीओ -
हेही वाचा : VIDEO : 'मला राक्षसांमध्ये...', चुकीचा स्पर्श करणाऱ्या धनुषच्या चाहत्यावर भडकली ॲंकर
गौतमीच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे, तर काही नेटकऱ्यांनी त्या मुलींच्या पालकांना ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'नको यांना या धंद्या ला लावू..... शिवकन्या आहेत त्या तुझ्या सारख्या नाचऱ्या कन्या नाही.....' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अग... तू नाचली ना बास झालं.... बाक्की च्या मुलींना नको हे धंदे करायला लावू..... खरंच...' तिसरा नेटकरी म्हणाला, 'गौतमी वेडी झाली.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तू नाच आणि अजून तुझ्या पुढं 10 तयार कर नाचायला... काय जरातर लाजावं की. देशाच भविष्य नाचवताना.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'गौतमी ताई तुम्ही नाचा. लहान मुली आहेत हो. विचार करा.' तर एका नेटकऱ्यानं त्या मुलींच्या पालकांना ट्रोल करत म्हटले की 'आदर्श कोनाकडुन घ्यावा हे समजल पाहीजे'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'यांच्या पालकांना भावपूर्ण श्रद्धांजली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पोट भरण्यासाठी नाचणं ते पण घाणेरडं हेच नाही आहे शिकली आहे ना आक्का तु जॉब कर की बंद कर धंदे तूझे अनपढ गवार लोकांसारखे काय उडया मारते अग हे बया धड साधी नीट नाच'. आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ही शिकवण देता का तुम्ही मुलांना... कुठे चाललाय महाराष्ट्र.'