VIDEO : 'मला राक्षसांमध्ये...', चुकीचा स्पर्श करणाऱ्या धनुषच्या चाहत्यावर भडकली ॲंकर

Dhanush Captain Miller Pre Release Event : धनुषच्या 'कॅप्टन मिलर'  या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी झालेल्या कार्यक्रमात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 5, 2024, 11:02 AM IST
VIDEO : 'मला राक्षसांमध्ये...', चुकीचा स्पर्श करणाऱ्या धनुषच्या चाहत्यावर भडकली ॲंकर title=
(Photo Credit : Social Media)

Dhanush Captain Miller Pre Release Event : दाक्षिणात्य अभिनेता धनुषचा 'कॅप्टन मिलर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं निर्मात्यांनी परवा 3 जानेवारी बुधवारी रोजी चेन्नईला एका कार्यक्रमाचे आयोजन केले. खरंतर, हा कार्यक्रम चित्रपटातील कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत आलेला नाही तर त्याचं कारण काही दुसरंच आहे. त्या कार्यक्रमात आश्चर्यकारक गोष्ट घडली. त्या दिवशी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणाऱ्या महिलेसोबत ऑडियन्समध्ये असणाऱ्या धनुषच्या एका चाहत्यानं छेडछाड केली. ते पाहता त्या सुत्रलंचालिकेनं त्याच्या विरोधात अॅक्शन घेण्याचा विचार केला आहे. 

त्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात कार्यक्रमाची सुत्रसंचालिका ऐश्वर्या रघुपति ही प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका माणसाला मारहाण करताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे ती व्यक्ती ऐश्वर्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा याचा व्हिडीओ समोर आला तेव्हा नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला पाठिंबा दिला आहे आणि चुकीची वागणूक देणाऱ्या व्यक्तीला सुनावले आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता ऐश्वर्यानं पहिल्यांदा वक्तव्य केलं आहे आणि तो असं काही करुन तिथून पळून जाईल. 

ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यात ऐश्वर्या बोलताना दिसली की 'त्या गर्दीत एका माणसानं माझी छेड काढली. मी लगेच त्याला लगेच तिथे थांबवलं आणि तो पर्यंत थांबले नाही जो पर्यंत त्याला खूप मारलं नाही. तो तिथून पळाला, पण तरी सुद्धा मी त्याला सोडलं नाही आणि त्याचा पाठलाग करत राहिले. मी हे सहन करू शकत नव्हते की त्यानं असं काही केलं. एका महिलेच्या शरिराच्या एखाद्या अंगाला पकडण्याची हिंम्मत त्यान कशी केली. मी ओरडले आणि खूप मारले. माझ्या आजुबाजूला अनेक लोक आहेत आणि मला माहित आहे की जगात खूप दयाळू आणि प्रेमळ लोक आहेत. पण मला अशा काही राक्षसांच्या जवळपास रहायला खूप भीती वाटते.' 

female Anchor Beats Dhanush Fan In Captain Miller Pre Release Event video viral

दरम्यान, धनुषच्या 'कॅप्टन मिलर' च्या निर्मात्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी या घटनेवर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. तर हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याचा हटके लूक पाहायला मिळणार आहे. खूप लांब केस आणि दाढी. तर चित्रपटाच्या पोस्टरमध्ये धनुषला ओळखनं देखील कठीण झालं होतं कारण तो पहिल्यांदा अशा लूकमध्ये दिसत आहे. 'कॅप्टन मिलर' या चित्रपटात प्रियांक अरुल मोहन, शिवा राजकुमार आणि संदीप किशन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.