Gehraiyaan: Kiss Scene करताना दीपिकाने रणवीरची परवानगी घेतली? वाचा तिचं भयंकर उत्तर
दीपिकाचा सिद्धांतसोबतचा `तो` बोल्ड सीन आणि रणवीर सिंहची प्रतिक्रिया
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या आगामी सिनेमा 'गहराइया' (Gehraiyaan) मुळे खूप चर्चेत आहे. ११ फेब्रुवारी रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. दीपिकाला या सिनेमात बोल्ड अवतार पाहता येणार आहे. गहराइया सिनेमात दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदीमध्ये इंटिमेट सीन दाखवण्यात आले आहेत. सध्या याचीच खूप चर्चा होत आहे.
दीपिका आणि सिद्धांत यांच्यावर चित्रीत केलेले रोमँटिक किसिंग सीन खूप चर्चेत आहेत. दीपिकाला एका मुलाखतीत विचारण्यात आलेलं की, तिने या सिनेमातील सीन्सकरता पती रणवीर सिंहची परवानगी घेतली होती का?
यावर दीपिका पदुकोणनने दिलेलं उत्तर अतिशय मजेशीर आहे.
बॉलीवूड बबलसोबतच्या मुलाखतीत दीपिका म्हणाली - जर आपण यावर रिऍक्ट होत असू तर हा निव्वळ मूर्खपणा आहे. मी यावर कधीच विचार करत नाही. मला वाटतं रणवीर देखील करत नसेल. माझ्यामते आमच्यासाठी हेच महत्वाचं आहे. माझ्यामते हे Yuck आहे. हे मूर्खपणासारखं वाटत आहे.
दीपिका सांगते की, तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंह याला गहराइंया या सिनेमामुळे पत्नीचा अभिमान वाटतो. दीपिका सांगते, मला वाटतं रणवीरला माझ्यावर गर्व आहे. तसेच रणवीरला माझ्या अभिनयावर देखील गर्व आहे.
शकुन बत्राने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून मॉर्डन रिलेशनशिप्सवर हा सिनेमा तयार केला आहे. दीपिकासोबतच या सिनेमात अनन्या पांडे, धैर्य करवा, सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत या सिनेमात दिसणार आहेत.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित या सिनेमाचा ट्रेलर खूप चर्चेत आला असून प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.
गहराइयाची स्टारकास्ट सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दीपिकाच्या स्टनिंग लुक्सने सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घातला आहे.
दीपिकाच्या ग्लॅमरस लूक्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे.