मुलाच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने शेअर केला खास संदेश...
अभिनेत्री-निर्माती जेनेलिया डिसूजा हीने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास संदेश सोशल मीडियावर शेअर केला.
नवी दिल्ली : अभिनेत्री-निर्माती जेनेलिया डिसूजा हीने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास संदेश सोशल मीडियावर शेअर केला.
त्यात ती म्हणते, माझी सवय, "माझं व्यसन असलेल्या माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रियान, खूप लहान असलास तरी तू मला खूप शिकवले आहेस. वर्तमानात जगणे, निस्वार्थी प्रेम करण्यास आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास शिकवले आहेस."
त्याचबरोबर जेनेलिया म्हणते, "तू माझे विश्व आहेस आणि मी अंतःकरणापासून तुझ्यावर प्रेम करते."
जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. दोघांना २०१४ मध्ये पहिला मुलगा झाला. त्याचं नाव रियान आहे. २०१६ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला.