जेनिलियाच्या `या` गिफ्टमुळे रितेश चाळीशीत झाला विशीतील तरूण
चाळीशीचा टप्पा म्हणजे अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने, त्यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक दृष्टीने जरा अधिक जागृत होण्याची वेळ असते.
मुंबई : चाळीशीचा टप्पा म्हणजे अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने, त्यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक दृष्टीने जरा अधिक जागृत होण्याची वेळ असते.
तिशीच्या पुढे जाताना हळूहळू चेहर्यावरील हास्य कमी आणि कपाळ्याच्या आठ्या वाढतात. पण अभिनेता रितेश देशमुख मात्र याला अपवाद आहे.
रितेशचा बर्थडे
नुकताच रितेशचा ४० वा वाढदिवस झाला. यानिमित्त जगभरातील चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. पण रितेशची पत्नी जेनिलिया देशमुखने मात्र त्याला एक खास गिफ्ट दिले आहे. आज रितेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून ते खास फोटो शेअर देखील केले आहेत.
जेनिलियाचे बर्थ डे गिफ्ट
जेनिलियाने रितेशला TESLA X ही महागडी एसयुव्ही कार गिफ्ट केली आहे. ही कार इको फ्रेंडली आहे. $80,000 पासून कारच्या किंमती सुरू होतात.
रितेशचं खास ट्विट
जेनिलिया आणि रितेश हे अनेकदा त्यांच्या आयुष्यातील खास क्षण सोशल मीडियामध्ये अगदी खुलेपणाने मांडतात. त्याप्रमाणे जेनिलियाचे गिफ्ट पाहून रितेश सुखावला आहे. रितेशच्या मते '४० वर्षाच्या बर्थ डे बॉयला २० वर्षाचं कसं करायचं हे बायकोला अगदी पक्कं ठाऊक आहे.
रितेश जेनिलिया क्युट कपल
१० वर्षाच्या रिलेशनशिपनंतर रितेश आणि जेनिलिया ही जोडी २०१२ साली लग्नबंधनात अडकली. आता त्यांच्या आयुष्यात राहिल आणि रिआन ही दोन मुलं आहेत.