COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : घुमा नावाचा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, या सिनेमाचं टीझर नुकतच यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं.  घुमा खास अस्सल ग्रामीण बाज आणि कथानक असलेला सिनेमा प्रेक्षकांना नवीन आनंद देणारा आहे. 


फक्त मनोरंजनासाठीच नाही तर नवीन संदेश देखील हा सिनेमा आपल्याला या निमित्ताने देवून जाणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा ग्रामीण भागात जो पेव फुटला आहे, त्याचे कसे परिणाम होत आहेत, यावर भाष्य करणारा हा सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. 


एकंदरीत ग्रामीण भागाचाच नाही, तर शहरी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय घुमामध्ये मांडण्यात आला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन महेश काळे यांनी केलं आहे, तर निर्माते डॉ नितीन दीघे आहेत. ६ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.