Gippy Grewal: गिप्पी ग्रेवाल (Gippy Grewal) पंजाबी चित्रपट आणि संगीत उद्योगातील सर्वात यशस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे ज्यांनी अलीकडेच संगीत उद्योगात दोन दशके पूर्ण केली आहेत. सिनेविश्वात काम करून त्याला बराच काळ लोटला असून त्याने आपल्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर वेगळे स्थान मिळवले आहे. 2002 मध्ये पदार्पण करण्यापूर्वी, त्याने एकदा पत्नी रवनीत कौरसोबत कॅनडामध्ये तीन नोकऱ्या केल्या, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गिप्पी ग्रेवालनं अतिरिक्त कमाईसाठी शौचालये देखील साफ केली आहेत आणि वर्तमानपत्रांचे वितरण देखील केले आहे. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आणि कॅनडामध्ये घालवलेले दिवस आठवले जे त्यांनी सगळ्यांसोबत शेअर केलेत. (Gippy Grewal Singer Even Cleaned Toilets To Earn Money nz)


हे ही वाचा - बॉलिवूडमध्ये 70-80 च्या दशकातील 'नारद मुनी' कोण होते? जाणून घ्या



हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिप्पी ग्रेवालने आपले स्वप्न पूर्ण केले आणि संगीतात करिअर केले याचा आनंद आहे. गिप्पी ग्रेवाल त्याच्या आगामी हनीमून या चित्रपटात जस्मिन भसीनसोबत दिसणार आहे. अमर प्रीत छाबरा दिग्दर्शित, हनीमूनच्या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असलेल्या कुटुंबाची कथा, हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गिप्पीने सांगितले की भारतातील लोकांना टॉयलेट किंवा तत्सम कोणत्याही कामाची स्वच्छता करणाऱ्या लोकांना अपमानित करायला कसे शिकवले जाते.


हे ही वाचा - Urfi Javed : उर्फीचा आतापर्यंत सर्वांत बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर


 


 




अतिरिक्त उत्पन्नासाठी स्वच्छतागृहे स्वच्छ केली


गिप्पी म्हणाला, 'शौचालय साफ करणं हे मोठं काम नसून ते छोटं काम आहे' अशा गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात हे आमचे दुर्दैव आहे. जेव्हा मी तिथे (कॅनडामध्ये) होतो तेव्हा माझी आई साफसफाई करायची ज्यामध्ये मॉपिंगचा समावेश होता. मी पण टॉयलेट साफ करायचो. मला ते करावे लागले आणि मला वाटले की ही एक सामान्य गोष्ट आहे, मला काही हरकत नव्हती. यासाठी मला जास्तीचा पगार मिळायचा आणि मी ते आनंदाने करायचो.


हे ही वाचा - Mallika Sherawat नं आज तिच्या भूतकाळाबाबत केला मोठा खुलासा,  ऐकून तुम्ही म्हणाल...


 


 


साडेचार वाजता उठून वर्तमानपत्र वाटायचे


तो पुढे म्हणाला, “आम्ही (गिप्पी आणि रवनीत) आनंदी होतो. आम्ही पती-पत्नी पहाटे साडेचारला उठून वर्तमानपत्र वाटायचो. गिप्पीने हे देखील आठवले की तो आणि त्याची पत्नी मोठी घरे आणि झाडे असलेल्या भीतीदायक परिसरात वर्तमानपत्र कसे पोहोचवायचे. गाडी चालवताना त्यांची पत्नी अंधारात वर्तमानपत्रे पोहोचवायला घाबरत असे, असे त्यांनी आठवले. पैशाने आयुष्यात आनंद विकत घेता येत नाही, असे गिप्पीचे मत आहे. त्याच्यासोबत त्याची को-स्टार जस्मिनही सामील झाली, तिने मुलाखतीदरम्यान त्याच्याशी सहमती दर्शवली.