COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : जॅक नाइट एक्स जॅस्मिन वालियाचे पंजाबी गाणं 'बम डिगी डिगी' गाण सर्वांच्या चांगलच पसंतीस पडतंय. या गाण्याची क्रेझ एवढी आहे की तरुणाई यातील तालावर ठेका धरत आहे. अनेकजण आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही करत आहेत. 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमातील हे गाणं प्रेक्षकांनी उचलून धरलं.  'सांगिका डान्स स्कूल' नावाच्या युट्यूब चॅनलने असाच एक व्हिडिओ अपलोड केलांय. यामध्ये एका तरुण आणि युवती 'बम डिगी डिगी' गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत.


६ लाख व्ह्यू  


१ महिन्यात हा व्हिडिओ ६ लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रीयाही याला मिळाल्या. २९ एप्रिल २०१८ ला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. यातील मुलीचे नाव सग्निका आणि मुलाचे नाव रजनीकांत असल्याचे सांगितले जात आहे.  या ३.१२ मिनिटांच्या व्हिडिओत  'बम डिगी डिगी' गाण्याचा वेगळा अॅंगल पाहायला मिळतोय.