बॉलिवूड: ... तर लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे सांगेन: रिचा चढ्ढा
बॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते.
मुंबई : बॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते. दरम्यान, याच मुद्द्यावरून अभिनेत्री रिचा चढ्ढा हिनेदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण लैंगिक शोषण करणारांची नावेदेखील सांगायला तयार आहोत. पण त्यासाठी आपल्याला सुरक्षेची खात्री मिळायला हवी असेही रिचाने म्हटले आहे.
वास्तव स्विकारणे धाडसाचे आहे
एका मुलाखतीदरम्यान रिचा बोलत होती. या वेळी बोलतान रिचा म्हणाली, बॉलिवूडमध्ये लौंगिक शोषण होते. हे वास्तव स्विकारणे धाडसाचे आहे. मात्र, लैंगिक शोषण करणारांची नावे कधीच पुढे येत नाहीत. कारण, त्यानंतर काम मिळण्याची खात्री नसते. अगदी हे उघड वास्तव असूनही अशा लोकांवर कारवाई होत नाही, असेही रिचा म्हणाली.
'... तर, मी नावे सांगेन'
दरम्यान, रिचाने सांगितले की, 'जर मला आपण आयुष्यभर पेन्शन दिली. माला सुरक्षेची खात्री दिली. माझ्या आणि माझ्या कुटूंबाचे रक्षण करण्याची हमी घेतली. तसेच, मला चित्रपट, टीव्ही आदि क्षेत्रात काम करालया मिळाले. जे की मला आवडत्या क्षेत्रात जे ही काही करावे वाटते ते करायला मिळण्याची खात्री असेन तर, बॉलिवूडमध्ये होणाऱ्या शोषणाबद्धल मी सांगायला तयार आहे. इतकेच नव्हे तर, ते करणाऱ्य़ा लोकांची नावे सांगायलाही मी तयार आहे.' पुढे बोलताना रिचा म्हणाली, 'केवळ मीच नव्हे तर, असे असंख्य लोक आहेत जे या शोषणाबद्धल बोलतील. पण, बोलणार कोण? या क्षेत्रात ही व्यवस्थाच नाही की, जी पीडितेला न्याय मिळवून देऊ शकेल.'
बॉलिवूड क्षेत्रातील व्यवस्था बदलण्याची गरज
'प्रत्येक वेळी जो कोणी बोलतो ती त्याची प्रितक्रिया असते. अशा वेळी त्यांना नाव विचारले जाते. पण, जर प्रसारमाध्यमांना माहिती आहे हे कोण करत आहे? तर ते सांगत का नाहीत? जर आम्ही एखादे पाऊल उचलले तर ती प्रतिक्रीया असते. बॉलिवूड क्षेत्रातील व्यवस्था आणि संपूर्ण रचनाच बदलण्याची गरज आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. पण, तो वापरणार कोण? मी माझ्या मनातील गोष्टी सांगितल्या. पण, मी काहीशी भाऊकही झाली आहे. जगभरात घडणाऱ्या घटनेमुळे मी अस्वस्थ होते', असेही रिचा म्हणाली.