मुंबई : बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान नेहमी त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये त्याला केआरे नावाने ओळखले जाते. नुकताच त्याने एक राजनैतिक ट्विट केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या संख्येने प्रतिक्रिया येत आहेत. केआरकेने त्याच्या ऑफिशीयल ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून समाजवादी पार्टीचे नेते आणि रामपूरचे खासदार आजम खान यांच्यावर निशाना साधला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नुकताचं झालेल्या एका मुलाखतीत आजम खान यांनी केलेल्या वक्तव्यमुळे केआरकेने ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाना साधला आहे. आजम खान बोलले की, 'मुसलमान १९४७ नंतर देखील शिक्षा भोगत आहे. जर फाळणीच्या वेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते, तर त्यांना ही शिक्षा भोगावी लागली नसती. मुसलमान भारतात आहेत, तर त्यांना शिक्षा भोगावीच लागेल.'


आजम खान यांच्या अशा वक्तव्यावर अभिनेता केआकेला त्याचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्याने खासदार आजम खानच्या वक्तव्यावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या. 'जर आजम खान यांना फाळणीच्या वेळेस पाकिस्तानमध्ये न गेल्याचे दु:ख होत असेल तर त्यांनी खुशाल आता पाकिस्तानात निघूण जावं. मी स्वत:त्यांच्या पूर्ण कुटुंबाला बिजनेस क्लासचे तिकीट काढूण देण्यास तयार आहे.' असे ट्विट केआरकेने केले आहे.


सोशल मीडियावर अजम खान यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे, तर केआरकेच्या पोस्टचे नेटकऱ्यांकडून समर्थन केले जात आहे. नेटकऱ्यांकडून केआरकेच्या ट्विटची प्रशंसा केली जात आहे. त्याचबरोबर त्याचे कौतुक सुद्धा करण्यात येत आहे.